Amalner

मासेमारीला गेलेल्या पिंगळवाडे येथील युवकाचा पाडळसरे येथील खदानीत बुडून मृत्यू….

मासेमारीला गेलेल्या पिंगळवाडे येथील युवकाचा पाडळसरे येथील खदानीत बुडून मृत्यू….

रजनीकांत पाटील

अमळनेर :- तालुक्यातील मासेमारीला गेलेल्या पिंगळवाडे येथील युवकाचा पाडळसरे येथील खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. १४ रोजी घडली आहे.
पिंगळवाडे येथील धर्मा पुंजू दाभाडे, ग्रा.पं. सदस्य यांचा मुलगा कुंदन (बाळा) धर्मा दाभाडे, वय २१ हा युवक इतर दोन साथीदारांसह सकाळी 11 वाजता मासेमारी करिता पाडळसरे येथे गेले होता. तापी नदीपात्रात असलेल्या खदानीत मासेमारीकरिता उतरले असता कुंदन हा पाय घसरून वाहत जावून पाण्याच्या भोवऱ्यात सापडला. सोबत असलेल्यांनी आरोळ्या मारून आजूबाजूच्या लोकांना जमा केले. त्यातील काहींनी पाण्यात उडी घेऊन शोध घेतला असता तीन तासांच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर शवविच्छेदनाकरिता मृतदेह ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे रवाना करण्यात आला. शवविच्छेदन डॉ. जी एम पाटील यांनी केले.

सदर युवक हा सुरत येथे कंपनीत कामाला होता. मात्र लॉकडाऊनमुळे घरी आल्याने त्याने मासेमारीचा व्यवसाय सुरू केला होता. त्याच्यापश्चात घरात आई, वडील, मोठा भाऊ, वहिनी असा परिवार आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पो. कॉ. साळुंखे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button