पाच राज्यातून भाजप हद्दपार
शरद पवार यांची पत्रकार परिषदेत माहीती
कोल्हापूर ःप्रतिनिधी
आनिल पाटील
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि काँग्रेस आघाडीची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे, तर भाजपला येथे धक्का बसला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, झारखंडच्या जनतेनं भाजपला स्वीकारलं नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान मोदींच्या सांगण्यात वस्तुस्थितीत अंतर आहे.
देशातल्या केवळ पाच राज्यांत भाजपची सत्ता राहिली आहे.
झारखंडसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या पाच राज्यांतून भाजप हद्दपार झाले आहे.
केंद्रातील सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरुनही झारखंडच्या जनतेने भाजपला स्वीकारलं नाही.
झारखंडच्या जनतेने वेगळ्या मार्गाने जाणाऱ्यांच्या हातात हात मिळवला आहे.
त्याबद्दल झारखंडच्या जनतेचे आभार, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
भाजपला महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
सर्वाधिक जागा लढवून देखील भाजपला येथेही सत्तेपासून दूर राहावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.






