Dharangaw

आईसाहेब जिजाऊना अभिवादन

आईसाहेब जिजाऊना अभिवादन

किरण चव्हाण

धरणगाव(दि 13)आदर्श माध्यमिक विद्यालय धरणगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ ना अभिवादन करण्यात आले.
ज्या आईच्या कुशीतुन स्वराज्याचे देखणं स्वप्न निर्माण झाले त्या राजमाता, राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आदर्श विद्यालयात जिजाऊ ना वंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक पी ए पाटील यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे सर्वच शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीं भाग्यश्री पाटील,स्वाती पाटील, भावना भदाणे, देवयानी सुतार,लक्ष्मी पतील यानी ‘जिजाऊ वंदना’ सादरकरून वातावरणात चैतन्य निर्माण केले.

” जिजाऊ चे विचारांचा वारसा आपण सर्वदूर पोहोचवले पाहिजे “असे प्रतिपादन अध्यक्ष पी ए पाटील यांनी केले.

या प्रसंगी सर्व शिक्षकांनी आपले मनोगतातून जिजाऊ चा जीवनपट मांडला
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील उपशिक्षक फिलीप गावीत, तुषार नाईक, वैशाली बाविस्कर, मुकेश तोरवणे,कांतीलाल पाटील यांनी सहकार्य केले.

सूत्रसंचालन किरण चव्हाण यानी केले तर फिलीप गावीत यांनी आभार मानलेत
या कार्यक्रमात सहभागी व मेहनती शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष सी के पाटील, व सचिव सौ सुरेखा पाटिल यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button