Chalisgaon

माझा संकल्प गुटखा मुक्त व्यसनमुक्त रांजणगाव

माझा संकल्प गुटखा मुक्त व्यसनमुक्त रांजणगाव

मनोज भोसले

ता.चाळीसगाव आज अखेर गावातील तसेच मित्र परिवारातील मिळून 150 ग्रामस्थांनी मिळून व्यसन मुक्तीचा संकल्प केला आहे तसेच ज्या मित्र मंडळी,ग्रामस्थांनी गुटखा सोडला आहे ते सुद्धा इतर मंडळींना गुटखा सोडण्या साठी प्रवृत्त करत आहे …. या व्यसनमुक्तीचा कामात सकाळी 7.30 ते 8.30 या वेळात घरो घरी जाऊन प्रबोधन करण्यात येत आहे ,याकामी गावातील तरुण मंडळी सुद्धा मला मदत करत आहे … गुटखा खाण्याच्या दुष्परिणामा विषयी घरच्या मंडळींशी जेव्हा हितगुज होते त्यांना जेव्हा गुटख्या पासून होणाऱ्या कॅन्सर हा आजाराची माहिती दिली जाते तेव्हा ते सुद्धा आपल्या परिवारातील सदस्या कडे गुटखा सोडण्याचा आग्रह करतात ..……. मागील आठवड्यात मुस्लिम मोहल्या मध्ये प्रबोधन करत असताना काही परिवारातील सदस्यांनी तर चक्क त्यांच्या धर्मातील पवित्र अश्या कुराण शरीफ वर हात ठेवून शपथ पूर्वक गुटखा सोडण्याचा संकल्प केला आहे. या कामासाठी गावातील सर्व मंडळी मला अगदी मनापासून मदत करत आहे .

प्रत्येक गावात खूप मोठ्या प्रमाणात गुटख्याचे सेवन ( व्यसन) केले जाते. रांजणगाव जवळील सांगवी गावात सुद्धा आम्ही हे काम सुरू केले आहे तेथील माझे मित्र लक्ष्मणभाऊ,उत्तमभाऊ,अंकुशभाऊ, रामेशभाऊ मला या महान कार्यासाठी मदत करत आहे ……आपणा सर्वांना विनंती की आपणही आपआपल्या गावात गुटखा मुक्ती साठी काम सुरू करावे व आपल्या गावातील तरुण वर्गाला कॅन्सर तसेच इतर होणाऱ्या आजारा विषयी माहिती देऊन या महाभयानक आजाराच्या विळख्यातून बाहेर काढावे ही नम्र विनंती ….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button