Dhule

हिरे मेडिकल येथे ATM लावण्यात यावे : मी धुळेकर

हिरे मेडिकल येथे ATM लावण्यात यावे : मी धुळेकर

असद खाटीक धुळे

धुळे : धुळे चक्करबर्डी येथील शासकीय हिरे मेडिकल येथे धुळे शहरातून तसेच ग्रामीण भागातून दररोज शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक विविध उपचारांसाठी येत असतात .
रुग्णांच्या नातेवाईकांना वेळोवेळी रात्री बेरात्री पैशांची गरज भासते . अशा वेळी जवळपासच्या परिसरात कुठे ATM नसल्याने त्यांना रिक्षा करून धुळे शहरात येऊन ATM ने पैसे काढावे लागतात . व अशा वेळी रात्री बेरात्री रिक्षाही नसल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो . तसेच यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णा जवळ देखभाली साठी न थांबता त्यांना सोडून शहरात यावे लागते .
नजीकच्या काळात कोविड – १९ च्या साथीमुळे हिरे मेडिकल येथे येणाऱ्या लोकांची संख्या आधीपेक्षा अधिक वाढली आहे .
त्यामुळे अशा गरजेच्या ठिकाणी ATM असणे आवश्यक च आहे . म्हणून हिरे मेडिकल आवारात ATM ( Automated Tellor Machine ) बसविण्यात यावे . ज्यामुळे लोंकांना त्या ठिकाणी २४ तास पैसे काढण्याची सोय उपलब्ध होईल . अशी मागणी मी धुळेकर संघटने तर्फे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आली .
यावेळेस मी धुळेकर चे अध्यक्ष निरंजन भतवाल , दिनेश वाघ , रफिक शेख , गोपाल पाटील , विशाल गायकवाड आदी उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button