कोल्हापूर येथील ध्यानचंद हॉकी स्टेडियम ला साडेपाच कोटींचा निधी मंजूर – खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांची माहिती –
कोल्हापूर( तुकाराम पाटील) –
कोल्हापूर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम साठी साडेपाच कोटी रुपये मंजुरीचा आदेशाचे पत्र केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू एचडी यांनी कोल्हापूरचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांना दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील हॉकी खेळणाऱ्या मुलांसाठी ध्यानचंद स्टेडियम हे वरदान ठरले आहे. जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धा याच मैदानावर पार पडतात, यासाठी या मैदानावर ॲस्ट्रो टर्फ व्हावे, ही बरेच दिवसांची मागणी होती, यासाठी निधी मिळत नव्हता, मात्र संभाजी राजे यांनी सतत यासाठी पाठपुरावा करीत होते. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या स्टेडियम साठी साडेपाच कोटी रुपयाचे मंजुरीचे पत्र राजेंच्या हाती दिले. याबाबत संभाजी राजे छत्रपति म्हणाले , या स्टेडियम साठी निधीचा पाठपुरावा घेत होतो. मा जी क्रीडा मंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्याकडे सतत भेटून पाठपुरावा करीत होतो. आता नवीन सरकार मध्ये या मंत्रालयाची जबाबदारी माझे मित्र किरण रिजिजू त्यांच्याकडे आली त्यामुळे माझे काम सोपे झाले. त्यांनी स्वतः या विषयात लक्ष घालून प्रसंगी काही नियम बाजूला सारून आपल्या या प्रस्तावाला मान्यता दिली. या मान्यतेमुळे खेलो इंडिया च्या माध्यमातून साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, पैकी अडीच कोटी रुपये खात्यावरच पाठवले आहेत , याबद्दल मोदी सरकारातील कर्तबगार मंत्री किरण रिजिजू यांचे स मस्त कोल्हापूरकरांच्या वतीने मनापासून आभार मानतो. यामुळे भविष्यकाळात कोल्हापुरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी खेळाडू तयार होण्यास मदत होईल, असा विश्वास खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.






