Amalner

जळगाव ग.स. वर प्रशासक नियुक्तीबाबत खंडपीठाने जिल्हा उपनिबंधकांना कार्यवाही करण्याचे दिले आदेश…

जळगाव ग.स. वर प्रशासक नियुक्तीबाबत खंडपीठाने जिल्हा उपनिबंधकांना कार्यवाही करण्याचे दिले आदेश…

अमळनेर :- जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्या., ग.स. सोसायटी म्हणुन परिचित असलेल्या संस्थेच्या संचालक मंडळाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला असल्याने प्रशासकाची नियुक्ती करावी याकरीता याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर खंडपीठाने उपनिबंधकांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

संचालक मंडळाने पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. त्यामुळे अशा संचालक मंडळास भारतीय संविधानाच्या कलम 243ZJ नुसार मुदत संपलेल्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात येतो. कलम 243ZK नुसार अशा संस्थेवर प्रशासकाची नियूक्ती होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सहकार अधिनियम व 97 घटनादुरूस्ती अन्वये संचालक मंडळाची मुदत ही फक्त पाच वर्षापुरतीच असते. महाराष्ट्र सहकार कायदा अधिनियम 1973 कलम 73AAA (3) अशा संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्याने प्रशासकाची नेमणुक होणे गरजेचे असल्याने मा,उच्च न्यायालय मुंबई खंडपिठ औरंगाबाद येथे सौ. दिप्ती योगेश सनेर यांनी रिट याचिका क्र 5876/2020 दाखल केली त्यात संबधीत संचालक मंडळाची मुदत कायद्यानुसार संपलेली असल्याने व सदर संचालक मंडळावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने भारतीय संविधानाच्या कलम 243ZKZ नुसार कायदेशीररित्या संस्थेवर प्रशासकाची नेमणुक करणेसंदर्भात याचिका दाखल केलेली होती. दिनांक 27 ऑगस्ट रोजी मा. न्यायालयाने आपल्या निकालपत्रात दिलेल्या निर्देशानुसार म,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांनी संविधानाच्या कायदा तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा नियमान्वये कार्यवाही करणेचे निर्देशीत केलेले आहे. सदरच्या निर्णयासंबधी तीन आठवड्यात म.जिल्हा उपनिंबधक सरकारी संस्था जळगाव यांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. सदर याचिकाकर्ते सौ.दिप्ती योगेश सनेर यांचेतर्फे न्यायालयात अँड. ए.बी. गिरासे व अँड वाय बी बोलकर, अँड. महेशकुमार सोनवणे यांनी तर शासनातर्फे अँड. डी आर काळे यांनी युक्तीवाद केला. तर सदर याचिकेवर मा.न्यायमुर्ती रविंद्र व्ही गुघे व मा.श्रीकांत डी कुलकर्णी यांनी वरीलप्रमाणे अंमलबजावणीचे निर्देश दिले. यासंबधी याचिका दाखल करणेसाठी रावसाहेब मांगो पाटील यांनी माहीती अधिकारात प्राप्त कागदपत्र व तक्रारी दस्तऐवज तसेच मार्गदर्शन केले. आर जे पाटील राज्य उपाध्यक्ष, अमरसिंग तिरसिंग पवार (ए टी पवार सर) ग.स. चे माजी संचालक राजेंद्र पुंडलिक साळुंखे, योगेश जगन्नाथ सनेर, सरचिटणीस शिक्षक संघ, जळगाव यांचेसह प्रगती गटातील नेते कार्यकर्ते यांचे सहकार्य मिळाले. गेल्या पाच वर्षाच्या गलथान कारभारामुळे सभासदांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तसेच अनेक संशयास्पद व्यवहार ही झाले असल्याचे विरोधी गटातर्फे सांगण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button