Latur

एसबीआयच्या दत्तक गावात रंगल्या कबड्डी स्पर्धा

एसबीआयच्या दत्तक गावात रंगल्या कबड्डी स्पर्धा

लातुर – प्रशांत नेटके
औसा:- एसबीआय फौंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्टान औरंगाबाद यांच्या सामाजिक दायित्व निधीतून ग्रामसेवा कार्यक्रम अंतर्गत कबड्डी स्पर्धा राबविण्यात आल्या. या स्पर्धेसाठी तपसे चिंचोली, गाडवेवाडी,लाडवाडी आणि गांजनखेडा इत्यादी गावातील खेळाडूने सहभाग नोंदवला होता.ग्रामीण भागातील युवकांची खेळाडू वृत्ती जागृत व्हावी ,ग्रामीण भागातील खेळांची जोपासना व्हावी या हेतूने गांजनखेडा येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उदघाटक म्हणून एसबीआय बँकेचे व्यवस्थापक बाळासाहेब थोरात, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गांजनखेडा गावचे सरपंच राजेंद्र पाटील,
प्रमुख पाहुणे म्हणून तपसे चिंचोली ग्रामपंचायत सदस्य पद्माकर तौर, दिलासा जनविकास प्रतिष्टानचे प्रकल्प व्यवस्थापक बापू कदम, विलास राठोड, एसबीआयचे व्यवसाय प्रवर्तक राहुल घुळे, विकास भारती, शरद पाटील, अनिल चव्हाण, मंगेश रामपुरे, विजय पाटील आदी उपस्थित होते.
या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक गांजनखेडा, द्वितीय क्रमांक गाडवेवाडी तांडा, तृतीय क्रमांक लाडवाडी संघाने पटकावला. यावेळी एसबीआय व दिलासा मार्फत विजेत्या संघाला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पाचही गावातील युवकांना क्रिकेट,व्हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन आदी खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button