बोदवड तालुक्यात अवैध धंद्यांना उत,!रिपाइंचे तहसीलदारांना निवेदन
बोदवड प्रतिनिधी :-सुरेश कोळी –
बोदवड तालुक्यात दारू,सट्टा, पत्ता,रेती,मुरूम,खडी, डबर, गौण खनिज, सह संपूर्ण बोदवड तालुक्यात अवैध धंदे बोकाळले असून याकडे पोलीस प्रशासन व महसुलचे कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रवींद्र जोगी यांना दिले आहे, निवेदनात म्हटले आहे की, बोदवड तालुक्यात अवैध दारू,सट्टा, पत्ता,रेती वाहतूक,खडी डबर,मुरूम अवैधपणे रात्री सर्रास केली जाते, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेले दारूचे सट्टा चे दुकान हलविण्यात यावे,रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थीना तात्काळ अनुदान देण्यात यावे ,रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात यावी ,रेशनदुकान दारांना दर महिन्याला रेशन वाटपाची पावती आदेश देण्यात यावे , बोदवड तहसील कार्यालयातील व पंचायत समिती मध्ये बरेच कर्मचारी 4 :30,वाजे नंतर कार्यालयात दिसून येत नाही, बोदवड तालुक्यात जेलिटीन स्फोटक ब्लास्टिंग करून अवैध उत्खनन चालू असून यामुळे घरांना हादरे बसतात,त्यामुळे घरांना तडे जात असून घरांचे नुकसान होत आहे, अवैध उत्खनन व ब्लास्टिंग करणारावर कारवाई करण्यात यावी ,संजय गांधी निराधार योजनेची मीटिंग दर तीन महिन्याला घेण्यात यावी ,नवीन रेशन कार्ड सुरू करण्यात यावे निवेदनाद्वारे केलेल्या मागणी बाबत पंधरा दिवसाच्या आत कार्यवाही करावी अन्यथा तहसील कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येतील असे निवेदन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे, निवेदन रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन ना खाली तालुका अध्यक्ष संजय तायडे,उप अध्यक्ष सदानंद वाघ,जिल्हा नेते भोपलू इंगळे,माहिती अधिकार कार्येकर्ते महासेन सुरळकर, जिल्हा कार्येकर्ते राजूभाऊ इंगळे,आदींच्या सह्या आहेत,






