Nimbhora

निंभोरा येथे आ.शिरीष चौधरी व प्रांत अधिकारी यांनी केली नुकसानग्रस्त केळीची पाहणी.

निंभोरा येथे आ.शिरीष चौधरी व प्रांत अधिकारी यांनी केली नुकसानग्रस्त केळीची पाहणी.
(दिरंगाईबाबत आ.शिरीष चौधरींनी केली पीकविमा कंपनी प्रतिनिधींची कान उघडणी.)

संदीप कोळी

निंभोरा-बु।। ता रावेर (वार्ताहर)
निंभोरा परिसरात काल दि.१० रोजी दुपारी व उशिरा रात्री झालेल्या चक्रीवादळामुळे निंभोरा,चिनावल,वडगाव,विवरा या परीसरात केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले.त्यात वडगाव व विवरा रस्त्यावरील निंभोरा शिवारात याची मोठी झळ केली उत्पादकांना बसली.कापणी योग्य केळीबाग असतांना व मंदीतून सावरत बाजारभाव तेजीत येऊन ७०० ते ८०० पर्यंत भाव येत असताना अचानक झालेल्या या चक्री वादळासह पावसामुळे अनेक केळीबागा जमीनदोस्त झाल्याने केळी उत्पादक हवालदिल झाले.

या केळी बागांच्या नुकसानीची पाहणी आ.शिरीष दादा चौधरी,प्रांत अधिकारी डॉ अजित थोरबोले,तहसीलदार उषाराणी देवगुणे,यांनी केली. यावेळी सरपंच डिगंबर चौधरी,सुनील कोंडे,मंडळाधीकारी सचिन पाटील,मंडळ कृषी अधिकारी वारडे, कृषी सहाय्यक सतीश तायडे,तलाठी समीर तडवी,ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील, कोतवाल प्रभाकर कोळी,निंभोरा येथील शेतकरी सुनील कोळंबे, रामदास सोनवणे,खंडू नेमाडे,निंबा भंगाळे,अक्षय भिरुड,कपिल वारके, विवेक बोंडे,रवींद्र भंगाळे,चुडामन पाटील,मोहन चौधरी,लीलाधर भिरुड, तसेच राजीव बोरसे,दिलीप सोनवणे ,आशिष बोरसे यांसह आदि उपस्थित होते.

विमाकंपनी प्रतिनिधींची आ.शिरीष चौधरी व तहसीलदार यांनी केली कान उघडणी-

यावेळी संबंधित विमा कंपनी प्रतीनिधिकडून मेलबॉक्स भरल्याचे सांगत भरलेले फॉर्म शेतकऱ्यांनी रावेर आणण्याबाबत तहसीलदार उषाराणी देवगुणे व आ शिरीष चौधरी यांनी मोबाईलवरूनच कान उघडणी करीत वरिष्ठांना कळविण्याबाबत सूचना देण्याचे सांगितले.तर तलाठी यांना तात्काळ पंचनामे करण्याचे सांगितले.

या परिसरातील काही केळीबागा कापण्या सुरू असून काही बागा अजून निसवण्याच्या आधीच जमीनदोस्त झाल्या

टिश्यूकल्चर मुळे खर्चात वाढ मात्र बाजारभावाने व वादळाने नुकसान-

या परिसरात मोठ्या प्रमाणावर टिश्यूकल्चर बागा असून एक खोडासाठी १००रुपयांपर्यंत खर्च येत असल्याने नुकसानीची पातळी कोटीच्या घरात जाते.

दरम्यान यासाठी शेतकऱ्यांनी उद्या दि.१२रोजी सकाळी १२वाजेपर्यंत कृषी विभागातपीक विमा नुकसानीबाबत फॉर्म जमा करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button