Amalner

आखाडा विधानसभेचा…. दोन विद्यमान आमदारांमध्ये रंगणार पारदर्शक लढत की केले जाईल जातीचे राजकारण????

 आखाडा विधानसभेचा….
दोन विद्यमान आमदारांमध्ये रंगणार “पारदर्शक” लढत की केले जाईल कट, कारस्थान करून जातीचे राजकारण???? 

आखाडा विधानसभेचा.... दोन विद्यमान आमदारांमध्ये रंगणार पारदर्शक लढत की केले जाईल जातीचे राजकारण????


अमळनेर 
विधानसभा निवडणुकीचा बिगुल संपूर्ण महाराष्ट्रात वाजला आहे.आज दुपार पर्यंत निवडणूक आयोगा तर्फे निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत राज्याच्या निवडणुकांच्या तारखा निश्चित होतील.या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे देखील विविध पक्षाच्या उमेदवारांची लगबग सुरू आहे. अमळनेर येथे भारतीय जनता पक्षाचे सहयोगी आमदार शिरिषदादा चौधरी, विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ,राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील,आय पी एस अधिकारी साहेबराव पाटील इ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
प्रत्यक्षात मात्र विद्यमान आमदार शिरिषदादा चौधरी आणि विधान परिषद आमदार स्मिता वाघ यांच्यात सरळ लढत होणार असे चित्र आहे. भारतीय जनता पक्षाचे तिकीट कोणाला मिळेल यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. बहुजन समाजातील विद्यमान आमदार शिरिषदादा चौधरी यांचे पारडे संपूर्ण तालुक्यात जड आहे.”सामान्यांचा आमदार” म्हणून त्यांनी नाव लौकिक मिळवला आहे.जनतेने ही त्यांच्या च बाजूने कौल दिला आहे. अर्थात आमदार शिरिषदादा चौधरी यांनी या पंचवार्षिक मध्ये ज्या वेगाने आणि पद्धतशीर विकास कामे केली ती कोणत्याही आमदारांनी गेल्या अनेक वर्षात केली नाहीत.जनता जात पात भेदभाव पाहणार की विकास कामे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण आता पर्यंत तालुक्यात जातीचे राजकारण सुरू होते.आजही त्याच मुद्यावर विरोधक एकत्र येऊन बहुजन समाजातील सर्व सामान्य आमदाराला घेरून हाणून पाडण्याचा डाव, कपट,कारस्थाने रचली जात आहेत. परंतु केलेल्या विकास कामांच्या जोरावर,दिलखुलास स्वभाव,प्रत्येक कार्यकर्त्यांची काळजी,चांगली वागणूक,गर्व हीन स्वभाव,उच्च प्रतीचे मॅनर्स,महिलांचा आदर(जो राजकीय क्षेत्रात कमी आढळतो)इ गोष्टी आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या जनतेला भावल्या आहेत.आता पर्यंत याच्या नेमका उलटा अनुभव सामान्य जनतेला आजपर्यंत आला आहे. शहरातील अत्यन्त अभ्यासू व्यक्तिमत्व फक्त उघड तोंड आणि महिलांचा आदर या दोन गोष्टींमुळे राजकारणात मागे पडले आहे.तर विधान परिषद च्या आमदार स्मिता वाघ यांना अजून तालुक्यात किती आणि कोण कोण पत्रकार आहेत याचीही खबर बात नाही त्यामुळे मोजक्या “आपल्याच”पत्रकारांशीच त्यांचा संपर्क आहे.याउलट आमदार शिरिषदादा चौधरी यांना “आदिवासींचा आमदार”,”बहुजनांचा आमदार” म्हणून सामान्य जनता ओळखते.
अर्थात पक्षाचे चित्र स्पष्ट होई पर्यंत बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात आहेत.काय होईल ते येणारा काळच ठरवेल.पुन्हा दाखल होऊ विकास कामांचा आलेख घेऊन…..तोपर्यंत विचार करा विकास कामाला प्राधान्य की इतर गोष्टींना????
क्रमशः…..….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button