? Big Breaking..कोरोना अमळनेर प्रशासनाचा पार्श्वभूमीवर ढिसाळ कारभार उघडकीस..कोरोना रुग्णाचा मृतदेह आढळला पारोळा येथे
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या
संपर्कात आलेला व्यक्ती
कोविड सेंटर मधून स्वॅब घेण्यापूर्वीच तीन दिवसांपासून बेपत्ता झाला असल्याची माहिती असून सदर इसमाचा पारोळा येथे अपघाती मृत्यू
झाल्याने जिल्हा भरात खळबळ उडाली आहे. जळगाव येथे महिलेचा
आणि अमळनेर येथे नागरिकाचा झालेला मृत्यू यामुळे स्थानिक उपविभागीय प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा यांच्या कार्या वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. अमळनेर च्या ढिसाळ प्रशासनाचे अनेक उदा कोरोना आपत्ती व्यवस्थापन काळात समोर आले आहेत.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की एका व्यक्तीसह त्यांची पत्नी व मुलगा याना ६ जुलै रोजी कोविड सेंटरला दाखल केले होते.मात्र परिवारातील त्यांचे काका हे बाहेर गेलेले होते. म्हणून त्यांचा स्वब घेण्यात आला नव्हता. पालिकेमधून त्यांना वारंवार काकांचा स्वब घेण्यासाठी कोविड सेंटरलाआणा म्हणून आग्रह केला जात होता. म्हणून त्यांनी 10 जुलै
काकांना कोविड सेंटरला दाखल करून त्याची
नोंदणी केली व रूम नम्बर ६८ मध्ये बसवून आले होते.
११ रोजी ते काकांची विचारपूस करायला गेले असता त्यांना ते आदल्या दिवशी शनिवारी दुपारपासून निघून गेल्याचे सांगण्यात आले.
प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांनी लोकांनी उडवा उडवीची उत्तरे
दिली. प्रशासन उत्तरे नीट देत नसल्याने त्यांनी माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्यावरून स्मिताताई वाघ यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत याना तक्रार करून उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांना देखील जाब विचारला.
यांनंतर सदर व्यक्ती चा मृतदेह पारोळा येथे अपघातात ठार झाल्याने आढळून आला आहे. आणि अमळनेर कोव्हीड केअर सेंटर च्या सुरक्षितता आणि व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या चार महिन्यांपासून अमळनेर च्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभाराचा प्रत्यय जनतेला आणि जिल्हा प्रशासनाला आला आहे. याचा पूर्ण पणे फटका जनतेला बसत असून शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच जाते आहे. आपल्या अकार्यक्षम कारभाराची जबाबदारी घेऊन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी जनतेतून केली जात आहे. अत्यन्त अकार्यक्षम आणि बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणा आणि शून्य नियोजन यामुळे अमळनेर शहरातील जनता वैतागली असून जनतेतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.






