Parola

पारोळा वासीयांनी पाळला “जनता कर्फ्यु चा आदेश “

पारोळा वासीयांनी पाळला “जनता कर्फ्यु चा आदेश “

पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी

पारोळा- हे गावं बालाजी महाराजांची पुण्यभूमी म्हणून ओळखली जाणारी आहे. गावातील सर्व वासीयांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाचे पालन करीत जनता कर्फ्यु पाळला. गावातील सर्व दुकाने पण टपरी, कापड दुकान, किराणा दुकान, गल्लीतील छोटी दुकाने बंद होते. शेतकरी व मजूर वर्गांनी देखील जनता कर्फ्यु ला साथ दिली.

पारोळा वासीयांनी पाळला "जनता कर्फ्यु चा आदेश "गावात कोणी ना कोणी काम निमित्त ये-जा करतांना दिसतात पण आज गाव पूर्णपणे ओस पडलेले दिसून आले. गावालगत राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 आहे पण या महामार्गावर फक्त अत्यावश्यक सेवेतील गाड्याच ये-जा करीत होत्या तसेच गावात पोलीस प्रशासनाने चांगल्या प्रकारे गस्त घातली.

पारोळा येथील जनतेने सायंकाळी 5 वाजेला घंटानाद व टाळ्याच्या गजरात कोरून विरुद्ध लढा देणाऱ्या व्यक्तींचे व पोलीस प्रशासनाचे आभार मानले व त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button