? ठोस प्रहार ब्रेकिंग…गटविकास अधिकारी यांना पंचायत समितीच्या सभापती यांनी मासिक सभा घेण्या संदर्भात मागितला लेखी खुलासा ..
अमळनेर येथील पंचायत समिती सदस्य यांची मासिक सभा आयोजित करण्याबाबत
तत्कालीन प्र गटविकास अधिकारी यांना वारंवार तोंडी सूचना देण्यात आल्या असून देखील मासिक सभा घेण्यात आली नाही.सद्यस्थितीत अमळनेर तालुक्यातील ग्रामीण
भागात कोरोना ह्या साथरोगाचा मोठ्या प्रमाणात पादुर्भाव दिसून येत असून त्यावर तातडीने
उपाययोजना करणे आवश्यक आहे.परंतु कार्यालयामार्फत आवश्यक पंचायत समिती सदस्य यांची मासिक सभा गेल्या ०३ महिन्यापासून वारंवार सूचना देवून देखील आयोजित केली नसल्याचे पत्र पंचायत समितीच्या सभापती रेखा पाटील यांनी दिले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार दरमहिन्याला पंचायत
समिती सदस्य यांची मासिक बैठक आयोजित करण्याबाबत बंधनकारक असून सदर बैठकीचे सदस्य सचिव म्हणून गटविकास अधिकारी यांची नियुक्ती केलेली असते त्यानुसार मासिक बैठकीचे आयोजन करून
त्याबाबत सदस्यांना सुचित करणे आपणास बंधनकारक आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना ह्या साथरोगाचा वाढता पादुर्भाव बघता सदर बैठकीच्या माध्यमातून तालुक्यातील उपाययोजनाचा आढावा घेणे आवश्यक आहे.
तरी, पंचायत समिती सदस्य यांची मासिक सभा येत्या ८ दिवसाच्या आत आयोजित
करण्याबाबत आपल्या स्तरावरील कार्यवाही तातडीने करावी.तसेच गेल्या ०३ महिन्यापासून मासिक सभा का आयोजित करण्यात आली नाही.याबाबत लेखी खुलासा सादर करावा.अशी मागणी पत्राद्वारे सभापती रेखा पाटील यांनी केली आहे.






