दिवा पेटविण्यापेक्षा चूल पेटविणे महत्वाचे
अमळनेर नूर खान
कोरोना या विषाणू ने हाहाकार माजवला आहे,याच्या विरुद्धची लढाई शासकीय पातळीवर केली जात आहे,डॉक्टर, पोलीस आणि इतर कर्मचारी जीवाची पर्वा न करता या कोरोना विरुद्धचा सामना करीत आहेत,गेल्या 21 तारखेपासून आपण सर्व प्राध्यापक आप-आपल्या घरात आहोत ,पण अमळनेर शहरातील ज्या लोकांचे हातावर पोट आहे,ज्यांचा रोटीचा प्रश्न रोजचा आहे, ते काय खात असतील?हा काळीज पिळवटून टाकणारा प्रश्न आम्हाला पडला,त्यानुसार कोणालाही प्रत्यक्ष कॉल न करता फक्त एका मेसेज वर प्रा.सुनील वाघमारे(महिला महाविद्यालय ) प्रा.विलास गावित,प्रा.योगेश पाटील,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,प्रा.रोहन गायकवाड,प्रा.अवीत पाटील,डॉ.रमेश माने,प्रा.विजय साळुंखे,डॉ.विजय तुंटे, प्राध्यापकांनी आर्थिक सहकार्य केले व पुज्य.सानेगुरुजींच्या वात्सल्य आणि ममत्वाची जाणीव करून देऊन *अंगणातील दिव्यापेक्षा घरातील चूल पेटवण्याचा अल्पसा प्रयत्न केला.*

तेल आणि अग्नी यांच्या एकत्र येण्यातून कोणती रासायनिक अभिक्रिया होते,काय माहीत,पण दिवा पेटवताना वातीतून चर्रर्रर्र असा आवाज येतो ना,अगदी तसेच,पालातील लोकांच्या पोटाची भूक पाहून आमच्याही काळजाचे झाले,हेही दिवस जातील,त्या लोकांच्या हाताला काम मिळेल अशी कामना करूयात.तोपर्यंत आपल्याकडून भटका समुदाय जो की ,शासनाच्या मिळणाऱ्या कसल्याही योजनांचा लाभार्थी तर सोडाच पण किमान त्यांच्याकडे साधे रेशनकार्ड ही नाही अशा कुटुंबांचा शोध घेऊन 30 कुटूंबना धान्य वाटप करण्यात आले.
मातृत्व आणि दातृत्वाच्या धारा दुथडी भरून वाहिलेल्या ज्ञानगंगेतील आपण सगळे सहप्रवासी आहोत,म्हणूनच आपण सर्वांनी हे औदार्य दाखवले त्याबद्दल आपल्या सर्व प्राध्यापकांचे आणि धान्य वाटप करताना ज्यांचे सहकार्य लाभले ते दिलीप शिरसाठ भाऊ आणि निलेश किर्तक यांचे जाहीर आभार!किराणा दुकानदार राजेश पंजवानी यांनी मसाला ,हळद यांचे प्रत्येकी एक पॅकेट(प्रत्येक किट मध्ये) फ्री दिल्यामुळे त्यांचेही आभार !आपण सर्वच एकमेकांच्या ऋणात राहुयात.
एका किटमधील साहित्य:
तांदूळ – 4 kg
तूर डाळ – 1kg
तेल – 1kg =
मीठ पुडा – 1
हळद-100gm
मसाला पुडी-1
मिरची पावडर – 1
साबण – 2
साखर-1kg
चहा पावडर-300 gm






