Amalner

?️अमळनेर कट्टा.. ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची तयारी..अमळनेर निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या धावपळीबरोबरच कामांचे योग्य नियोजन…असा आहे निवडणूक कार्यक्रम

?️अमळनेर कट्टा.. ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची तयारी ..अमळनेर निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या धावपळीबरोबरच कामांचे योग्य नियोजन

अमळनेर येथिल ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असून दि 15 जाने रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. काल दि 12 जाने रोजी उमेदवारांच्या नावांच्या यादी सह मशीन सील करण्याचे काम शहरातील इंदिरा भुवन मध्ये पार पडले.तर आज ग्राम पंचायत निवडणुकीच्या महत्वपुर्ण साहित्याचे गावानुसार वर्गीकरण करूनबकापडी पिशव्यांमध्ये बंद करून तयार करण्यात आले.यात मतदार यादी,पट्टी सील,अड्रेस टॅग,गुलाबी सील,पितळी सील,मार्कर पेन इ साहित्याचा समावेश असून स्टेशनरी किट देखील त्या त्या ग्राम पंचायत ला रवाना करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. सर्व साहित्य वाटप उद्या सकाळी 8 वाजून 30 मि नी केले जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी मा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिली आहे.

तसेच एकूण मतदान केंद्र 154 असून 875 कर्मचारी काम करणार आहेत. या व्यतिरिक्त 100 ते 125 कर्मचारी महसूल प्रशासनाचे कार्यरत असणार असल्याची माहिती वाघ यांनी दिली आहे. एकूण 67 निवडणूक अधिकारी कार्यरत असतील,14 एस टी बस ,25 क्रूझर,तर 5 शासकीय वाहने सेवेत असतील अशीही माहिती निवडणूक अधिकारी मिलिंदकुमार वाघ यांनी दिली आहे.

निवडणूक कार्यक्रम …

13 जाने 2021….साहित्य वाटप पूर्व तयारी

14 जाने 2021…साहित्य वाटप सकाळी 8.30 मि

15 जाने 2021..मतदान ..सकाळी 7.30 मि पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत

17 जाने 2021..मतमोजणी प्रशिक्षण सकाळी 10.00 वाजता इंदिरा भुवन,अमळनेर

18 जाने 2021..मतमोजणी सकाळी 8.00 वाजेपासून इंदिरा भुवन,अमळनेर

ग्राम पंचायत निवडणुका सुरळीत व शांततेत पार पडावी म्हणून प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. या अनुषंगाने नियुक्त कर्मचाऱ्यांना आता पर्यंत दोन प्रशिक्षण देण्यात आले आहेत. काल दि 12 जाने रोजी इंदिरा भुवन येथे निवडणूक विभागाकडून मशीन सील सह उमेदवार यादी लावण्या चे कामे अमळनेर तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीतपणे पार पडले. याकामी एकूण 57 कर्मचारी कार्यरत होते तर 154 ईव्हीएम मशीन सज्ज ठेवण्यात आले आहे.15 मशीन अतिरिक्त असल्याचे तहसीलदार वाघ यांनी ठोस प्रहारशी बोलतांना सांगितले.

सदर निवडणुकित काही ठिकाणी मैत्री पूर्ण लढत तर काही ठिकाणी चुरशीची लढत पाहवयास मिळेल. काही ठिकाणी एका उमेदवारा साठी निवडणूक यंत्रणा राबविण्यात येत आहे. या निवडणूकित तरुणांना संधी मिळेल की जुनी राजकारणी मंडळी राजकीय डावपेच टाकत वर्चस्व अबाधीत ठेवतील याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button