Maharashtra

चाळीसगावात शिवसेनेतर्फे व्यंकय्या नायडू यांचा निषेधाचे निवेदन

चाळीसगावात शिवसेनेतर्फे व्यंकय्या नायडू यांचा निषेधाचे निवेदन

रजनीकांत पाटील

चाळीसगाव राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी या खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या उच्याराला आक्षेप घेतल्याच्या निषेधार्थ चाळीसगावात शिवसेनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयात तहसीलदार राहुल मोरे यांना निवेदन देऊन निषेध केला.

दिनांक 22 रोजी राज्यसभेत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपली शपथ संपल्यानंतर जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी असा छत्रपती शिवाजी महाराज व जन्मभूमी महाराष्ट्र विषयी आदरयुक्त उल्लेख केल्याने यास राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी हे माझे चेंबर असून या ठिकाणी अशा पद्धतीचे स्लोगन उच्यारणे योग्य नाही असे बोलून आक्षेप घेतल्याने सर्वत्र महाराष्ट्रभर याचा निषेध होत असून छत्रपती शिवरायांचा उल्लेख करणे हे राज्यसभेत चालत नसेल तर हा शिवरायांचा अपमान आहे.

ही भावना समस्त शिवप्रेमी शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली असून भारतीय जनता पार्टीला छत्रपती शिवरायांबद्दल किती आकस आहे हे यावरून दिसून येत आहे. व्यंकय्या नायडू यांनी याबाबत त्वरित माफी मागून राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील,तालुका प्रमुख रमेश चव्हाण, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, तालुका संघटक सुनील गायकवाड, माजी नगरसेवक संजय ठाकरे, उपशहर प्रमूख शैलेंद्र सातपुते, दिनेश विसपुते, चेतन कुमावत आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button