Amalner

रिक्षाची तोडफोड..पोलीस ठाण्यात रिक्षाचालकांचा निषेध  मोर्चा..जाणून घ्या घटनेची दुसरी बाजू ..

रिक्षाची तोडफोड..पोलीस ठाण्यात रिक्षाचालकांचा निषेध मोर्चा

अमळनेर येथे रिक्षा चालकांनी पोलीस ठाण्यात मोर्चा नेला आहे.या बाबतीत अधिक माहिती अशी की भाडे ठरवण्यावरून निर्माण झालेल्या वादातून रिक्षाचालकांशी रविवारी रात्री अमळनेर बसस्थानकात तिघे जणांनी वाद घातल व रिक्षाची तोडफोड केली. याच्या निषेधार्थ सोमवारी रिक्षा बंद आंदोलन करत रिक्षाचालकांनी पोलीस ठाण्यात रिक्षा मोर्चा काढला.पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील, टॅक्सी युनियन अध्यक्ष बंडू केळकर, रिक्षा युनियनचे अध्यक्ष कैलास माळी यांच्याशी चर्चा करून आरोपीना शिक्षा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद आंदोलन मागे घेण्यात मोर्चा परत फिरला.

दरम्यान या घटनेची दुसरी बाजू अशी सांगण्यात येत आहे की रात्री एक मुलगा व मुलगी बस स्थानकात आले व रिक्षा चालकास राजाराम नगर येथे सोडण्यास सांगितले.यावेळी त्या मुलीचा हाथ धरून तिला रिक्षात बसविण्यात आले असल्याचे त्या मुलीने सांगितले आहे. सदर मुलगी अल्पवयीन असून रात्री तिने पोलीस ठाण्यात देखील सदर तक्रार केली आहे. पण तिच्या तक्रारीकडे लक्ष न देता उलट त्यांनाच पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.मुलीची छेडछाड केली म्हणून मुली सोबत असलेल्या मुलाचा भाऊ मध्ये पडला आणि बोलचाल झाली ह्या सर्व प्रकाराचा राग येऊन रिक्षा तोडली असे संबंधित तरुणाने भ्रमणध्वनी वरून सांगितले आहे. तसेच काल रात्री पोलिसांनी सदर तरुणास मारहाण केली व आजही मारहाण केली असल्याची तक्रार संबंधित तरुणाने केली आहे. या सोबत एक अल्पवयीन मुलगा जो मालेगाव येथून आलेला आहे त्याचा सदर प्रकरणाशी काही संबंध नसताना देखील त्याला देखील पोलीस ठाण्यात डांबून ठेवले असल्याची माहिती दिली आहे. यामुळे पोलिसांच्या एकूण भूमिकेबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. अशी चर्चा गावात सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button