Amalner

Amalner: अर्बन बँकची निवडणूक…पैसा, प्रतिष्ठा पुढील राजनितीची…!

Amalner: अर्बन बँकची निवडणूक…पैसा, प्रतिष्ठा पुढील राजनितीची…!

अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक अमळनेर पंचवार्षिक निवडणूक 2023 चे मतदान झाले. यात सहकार पॅनलच्या 13 पैकी 11 जागांवर उमेदवार निवडून आले.
अर्बन बँक च्या निवडणुकीमध्ये शहरातील अनेक मातब्बर उमेदवार उतरलेले होते व अनेकांसाठी ती प्रतिष्ठेची झालेली होती.तस पाहिलं तर एका बँकेच्या निवडणुकीत पैसे वाटप करणे हे अयोग्य आहे. पण तरीही पैसे वाटप देखील करण्यात आले होते. दरम्यान मतदानाच्या आदल्या दिवशी शहरात हिंदू मुस्लिम दगडफेक होवून मतदानाच्या दिवशी संचार बंदी आणि जमाव बंदी जाहीर करण्यात आली होती. यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली सर्वात कमी मतदान झाले. कमी मतदानामुळे अनेक उमेदवार नाराज झाले. उमेदवारांनी मतदारांना पैशांचे प्रलोभन दिले होते. पण जीवाला घाबरून निम्मे च्या वर मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. कमी मतदानाचा फटका काही उमेदवारांना बसला तर काहींना फायदा झाला.

सर्वसाधारण मतदारसंघ – प्रवीण जैन, पंकज मुंदडे, लक्ष्मण महाजन भरतकुमार ललवानी, प्रदीप कुमार अग्रवाल, दीपक साळी, अभिषेक पाटील, प्रवीण पाटील,
महिला राखीव मतदार संघ – वसुंधरा दशरथ लांडगे व मनीषा लाठी
ओबीसी मतदारसंघ– पंडित नाना चौधरी
भटक्या विमुक्त जाती – मोहन सातपुते
अनुसूचित जातीत जमाती संघ – रणजित शिंदे

सहकार पॅनलचे 11 व इतर दोन उमेदवार निवडून आले आहेत. अनेक विजय उमेदवारांनी जमाव बंदी आणि संचार बंदी असताना आनंदोत्सव साजरा केला. सर्व निवडणूक कर्मचारी यांनी निवडणुकीचे काम अमळनेर इंदिरा भवन येथे चोख पार पाडले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button