Amalner

विभागीय खान्देशी बोलीभाषा मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

विभागीय खान्देशी बोलीभाषा मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

अमळनेर येथील विभागीय खान्देशी बोलीभाषा मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.साहित्यिक व रसिकांच्या स्वागतासाठी भरगच्च कार्यक्रमांची मांदियाळी हे पू. सानेगुरुजी साहित्य नगरीत संपन्न होणाऱ्या संमेलनाचे वैशिष्ट्य राहिल.साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.राजेंद्र गवस हे उदघाटक तर साहित्यिक अशोक कोळी हे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित असतील.
दि.२३ व २४ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या विभागीय खान्देशी बोलीभाषा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन पू. साने गुरुजी सार्व ग्रंथालय व मोफत वाचनालय हे आहेत.नुकतीच संमेलनाचे अंतिम तयारीची आढावा बैठक ग्रंथालयात संपन्न झाली.सदर बैठकीत कार्यक्रम यशस्वीतेसाठी मान्यवरांच्या सहभागाने विविध समितीचे गठन करण्यात आले.संमेलनाचे स्वा गताध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी ,’भव्य व आकर्षक लोकसंस्कृती व साहित्यिक परंपरेचे देखावे आणि आकर्षक चित्ररथाने सज्ज अश्या ग्रंथ दिंडी सोहळाने सुरुवात होणाऱ्या खान्देशी बोलीभाषा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अमळनेरच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उपस्थितांना केले. ग्रंथालयाचे सचिव प्रकाश वाघ यांनी प्रास्ताविकात, नियोजन समित्यांची माहिती देत पूर्व तयारीबाबत आढावा घेतला.यावेळी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य रमेश पवार यांनीही अमळनेरच्या साहित्य परंपरेला साजेसे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन केले.उपाध्यक्षा माधुरी भांडारकर, संदिप घोरपडे,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी साहित्य संमेलनाचे आयोजन नियोजनात नवोदित साहित्यिक व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.तर पत्रकार उमेश काटे , ईश्वर महाजन व विजयसिंग पवार,विजया गायकवाड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
छ. शिवाजी महाराज नाट्यगृह येथे संपन्न होणाऱ्या विभागीय खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संमेलन कार्यवाह समिती अंतर्गत विविध समितीचे यावेळी गठन करण्यात आले आहे .यात प्रामुख्याने ग्रंथदिंडी समिती, नाट्यगृह व रंगमंच सजावट समिती, प्रचार व प्रसार समिती,निवास व भोजन समिती, व्यवस्थापन समिती, स्वागत समिती अश्या विविध समित्यांचे गठन यावेळी करून जाहीर करण्यात आल्यात.
सदरच्या पूर्वतयारीच्या बैठकीस नगीणचंद लोढा, डॉ.शैलजा माहेश्वरी, ऍड.तिलोत्तमा पाटील, अनिल घासकडावी,अरुण सोनटक्के, भीमराव महाजन,नरेंद्र पाटील,विकास ब्राह्मणकर,कमलाकर संदानशिव, गोकुळ बागुल,शैलेश काळकर, ऍड.रामकृष्ण उपासनी, निलेश पाटील,दिपक वाल्हे,संचालक चंद्रकांत नगावकर, पी एन भादलीकर , यांचेसह भारती कोठावदे,ज्योतीर्मयी सोनवणे, रुपाली पवार,आदि उपस्थित होते.आभार सुमित धाडकर यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button