Nashik

फैजपूर येथील मौलाना अबुल कलाम आझाद शॉपिंग कॉम्प्लेक्स आवारात झालेल्या काँक्रीटीकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे तीन तेरा वाजने सुरू

फैजपूर येथील मौलाना अबुल कलाम आझाद शॉपिंग कॉम्प्लेक्स आवारात झालेल्या काँक्रीटीकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे तीन तेरा वाजने सुरू
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
नाशिक : येथील नगर परिषद अंतर्गत होणाऱ्या मौलाना अबुल कलाम आझाद शॉपिंग कॉम्प्लेक्स काँक्रीटीकरणाचे तीनतेरा वाजने सुरू झाले असून सखोल चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात येत आहे एक कोटी रुपयात मंजूर झालेल्या या कामाचे निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचे चित्र असून या काँक्रिटीकरणामध्ये सर्रास घेसु माती मिक्सिंग व हलक्या दर्जाच्या सिमेंट अल्पप्रमाणात आसारी यामध्ये सर्रास वापर झालेला असल्यामुळे व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे स्वतः नगरपरिषदेचे इंजिनीयर फारूकि कामा जवळ हजर असताना सुद्धा या ठेकेदाराने त्यांची एक हीसुद्धा ऐकलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे नगरपरिषदेचे इंजिनिअर यांनी वेळोवेळी सांगूनसुद्धा ठेकेदारांच्या मनमानी कारभार सुरूच राहिला गेल्या दीड महिन्याच्या कार्यकाळापासून काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले तेव्हापासून नगर परिषदेचे इंजिनीयर हे काँक्रिटीकरना ठिकाणी हजर असतानासुद्धा ठेकेदाराने त्यांचे सुद्धा ऐकले नसल्याचे निदर्शनात आले परंतु पालिकेचे इंजिनीयरचे आदेशसुद्धा ऐकले नाही व इस्टीमेटप्रमाणे सुद्धा काम केले नसल्यामुळे कोणाची मिलीभगत आहे व या ठेकेदाराने कोणाच्या भरोसे मनमानी कारभार सुरू केला आहे याची चौकशी करावी अशी मागणी जनसामान्यांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे मौलाना अबुल कलाम आझाद शॉपिंग कॉम्प्लेक्स आवारात झालेल्या काँक्रीटीकरणामध्ये ९५टक्के घेसु माती मिक्सिंगच्या सर्रास वापर केला गेला असल्यामुळे या काँक्रीटीकरणाचे पहिल्या पावसातच शासनाचे एक कोटी रूपये पाण्यात जाणार असल्याचे चित्र असून आत्तापासूनच या काँक्रिटीकरणाचे तीनतेरा वाजण्यास सुरूवात झाली असल्याचे चित्र आहे सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे दीड महिन्याच्या कार्यकाळापासून सुरू असलेल्या या काँक्रीटीकरणामध्ये जेव्हा निकृष्ट दर्जाच्या बातम्या प्रसारित झाले तेव्हा पालिकेचे इंजिनिअर यांनी उरलेल्या ५ टक्के कामात केवळ एकच ट्रॅक्टर उत्तम दर्जाची रेती आणून ठेकेदाराने इंजिनियर यांच्या गैरहजेरीत काँक्रिटीकरण पूर्ण करून टाकले या संपूर्ण काँक्रीटीकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी असून उर्वरित नाला दुरुस्ती तसेच काँक्रीटीकरणाचा ठेका याच ठेकेदाराकडे आहे उरलेले काम याच ठेकेदाराकडे आहे तर राहिलेल्या काँक्रिटीकरण व नाला दुरूस्ती हा ठेकेदार उत्कृष्ट दर्जाचे करेल का असा प्रश्न सुद्धा जनसामान्यांमध्ये उपस्थित झालेला आहे हे उर्वरित हे काम जर याच ठेकेदाराकडे राहिल्यास काम पारदर्शकपणे नगर परिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी जातीने लक्ष देऊन उत्कृष्ट काम इस्टीमेटप्रमाणे करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button