Chandwad

? महत्वाचे..इम्युनिटी स्ट्रॉंग असणे गरजेचे-डॉ आदित्य निकम

इम्युनिटी स्ट्रॉंग असणे गरजेचे-डॉ आदित्य निकम

चांदवड उदय वायकोळे

चांदवड शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.आजही 27 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.यापैकी काही जुन्या रुग्णांच्या संपर्कातील तर काही नवीन व्यक्ती आहेत. चांदवड उपजिल्हा रुग्णालय परिसरात असलेल्या कोव्हीड सेंटर मधील डॉ आदित्य निकम यांचेशी आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितले की पूर्वी फक्त शहरी भागात रुग्ण आढळत होते मात्र आता ग्रामीण भागातून एकच कुटुंबातून सुद्धा अनेकांना कोव्हीड चा प्रादुर्भाव होत असल्याने प्रत्येक नागरिकाने आपली इम्युनिटी स्ट्रॉंग कशी राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच प्रशासनाकडून देत असलेल्या सूचनांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे.

चांदवड कोव्हीड सेंटर मधून आतापर्यंत अनेक रुग्ण ठणठणीत होऊन घरी गेलेले आहेत,त्यामुळे योग्य काळजी घेऊन नियमांचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे अशी आशा काही बरे झालेल्या रुग्णांनी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button