Parola

चोरवड येथून 63 हजाराच्या ठिबक नळ्या चोरीला

चोरवड येथून 63 हजाराच्या ठिबक नळ्या चोरीला

पारोळा : पारोळा तालुक्यातील चोरवड येथील दोन शेतकऱ्यांची ठिबकचे 63 हजार रुपयाचे 42 बंडल कोणीतरी अज्ञात इसमाने कापून चोरीला नेल्याची घटना घडली

पारोळा तालुक्यातील चोरवड येथील बाळू बारकू जगताप यांनी फिर्याद दिली की दिनांक सोळा च्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या शेतातील व त्यांच्या शेजारी असलेल्या अनिल दिलीप पाटील यांच्या दोघांच्या शेतात ठेवलेल्या ठिबक च्या नळ्याचे एकूण 42 बंडल किंमत सुमारे 63 हजाराच्या जवळपास होती ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीचा इराद्याने शेतातून कापून घेऊन गेल्याची घटना घडली याबाबत आज पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर चौधरी करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button