दिंडोरी मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के: नागरिकांनी घाबरून जाऊ नये तहसीलदार पंकज पवार यांचे आवाहान
दिंडोरी । सुशिल कुवर
दिंडोरी शहरासह परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने मात्र घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. हे धक्के नेमकं कोणत्या कारणाने झाले याची अजून खात्रीशीर माहिती नसली तरी नागरिकांनी घाबरून न जाता सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दिंडोरी तालुक्यातील , दिंडोरी शहर, मडकीजांब , हातनोरे, निळवंडी , जांबुटके, उमराळे (बु), तळेगाव येथे भूकंपाचे धक्के बसल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
आकाशात काहीतरी आवाज होऊन जमिनीला हादरे बसल्याचे चर्चा सोशल मीडियावर चालली होती. यात सर्वात जास्त हादरे जांबुटके गावात बसत असल्याची माहिती शिवसेना नेते विठ्ठलराव अपसुंदे यांनी दिली. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार पंकज पवार यांच्याकडून घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात येत असले तरीही नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये- तहसीलदार पंकज पवार
दिंडोरी तालुक्यात विविध गावांना भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून याबाबत मेरी येथील संशोधन केंद्रात त्याबाबत कोणतीही नोंद नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कळते.याबाबत नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नये असे मी आवाहन करतो.
– पंकज पवार, तहसीलदार, दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंप सदृश्य धक्के बसले.या धक्क्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, शांतता राखावी.
– अमोल गिते, पोलीस पाटील, मानोरी






