संचारबंदीमध्ये पोलिसांना सहकार्य करणाऱ्या निवृत्त सिमा सुरक्षा दल कर्मचारी,स्वयंसेवकांच्या सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवर..
संदीप सैंदाने
अमळनेर कोरोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घ्ट होत आहे. दिना्क ६/५च्या १८ जनांच्या आकडेवारीने अमळनेरकर जनतेसह प्रशासन भयभित झालेले आहेत.रस्त्यावरिल लोकांची रहदारी कमी करतांना पोलीसांवरिल तान वाढतो आहे या अनुषंगाने प्रशासनाने सिमा सुरक्षा दलाचे निवृत्त कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त केलेले आहेत त्यासोबत परिसरातिल सामाजिक कार्यकर्ते सुद्धा मदत करत आहेत. जनतेला हटकतांना कुलुपबंदचे,संचारबंदीचे,कोरोना संसर्गाचे गांभीर्यीबद्दल ,प्रशासनाच्या भुमिकेबद्दल पोटतिडकीने जागृत करतांना दिसत आहेत .प्रसंगी हमरीतुमरी करणाऱ्या मंडळीना दंडुक्याचा प्रसाद सुध्दा देतात.या सर्व बाबींमागे त्यांचा फक्त एकच उद्देश की माझा अमळनेरचा नागरीक सुरक्षीत असला पाहीजे किंबहुना माझ्या देशातील भारतिय स्वस्थ असावा ..
प्रशासनाने त्याच्या सुरक्षीततेसाठी मास्क,ग्लोव्ह्ज,निर्जंतुक औषध हे दिले पाहिजे ज्यामुळे सुरक्षा रक्षक,स्वयंसेवक हे सुरक्षित राहतिल.एखाद्या सेवाभावी संस्थेने ,दानशुर दात्यांनी त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे हा नागरिकंमधून मागणी होतै आहे.






