Nashik

हाथरस येथील बलात्कार प्रकरणी खिर्डी येथे सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या वतीने कॅंडल मार्च

हाथरस येथील बलात्कार प्रकरणी खिर्डी येथे सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या वतीने कॅंडल मार्च

भिमराव कोचुरे

हाथरस येथील बलात्कार प्रकरणी खिर्डी येथे सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या वतीने कॅंडल मार्च काढण्यात आला. खिर्डी प्रतिनिधी – भिमराव कोचुरे. उत्तर प्रदेशात हातरस येथे मनीषा वाल्मिकी या दलीत मुलीवर सामूहिक बलात्कार करून पीडित मुलीची जीभ कापून अन्याय अत्याचार करण्यात आले.वेळेवर योग्य ते उपचार ही केले नाहीत.अखेर त्या पीडित मुलीचे निधन झाले.सदरील घडलेली घटना संपूर्ण मानव जातीला काळीमा फासणारी असून सर्वांना लाजीरवाणी असून शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. उत्तर प्रदेश मध्ये कायदा सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. तसेच मनीषा वाल्मिकी या बहिणीला न्याय मिळावा व बलात्कार करणाऱ्या पाशवी वृत्तीच्या नराधमांना तात्काळ फाशी द्यावी व उत्तर प्रदेश मधील योगी सरकार बरखास्त करावे व सीबीआय चौकशी करण्यात यावी या करिता खिर्डी खु येथे बस स्थानक परिसरात सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी कॅण्डल मार्च काढण्यात आला. श्रध्दा जली देण्यात आली, सरकारने बलात्कार विरोधी कडक कायदे करावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष. मा. दिपक भाऊ पाटील, यांनी व्यक्त केले. उपाध्यक्ष सतिष भाऊ फेगडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, खिर्डी बु.चे लोक नियुक्त सरपंच किरण कोळी, दै.सकाळ धुंदले सर,दै.पुण्य प्रताप विनायक जहुरे रा. का यु.कोषाध्यक्ष गणेश बोरनारे, रा.का. यू. ता अध्यक्ष अकील शेख, उमेश तायडे, बौध्द पंच मंडळ अध्यक्ष विनोद कोचुरे,ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button