Faijpur

यावल जिल्हा जळगाव भारतीय सैन्याचा पराक्रम गौरवास्पद आणि प्रेरणादायी – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

यावल जिल्हा जळगाव भारतीय सैन्याचा पराक्रम गौरवास्पद आणि प्रेरणादायी – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

सलीम पिंजारी

उरी येथील भारतीय सैन्य तळावर झालेल्या भ्याड आत्मघातकी आतंकवादी हल्ल्यात हौतात्म्य मिळालेल्या भारतीय जवानांच्या बलिदानाचा सूड म्हणून पाकव्याप्त काश्मीर मधील आतंकवादी तळांना उध्वस्त करून भारतीय सैन्याने प्रत्येक भारतीयाचे मनोबल उंचावले असून जगातील सर्वश्रेष्ठ सैन्यापैकी एक म्हणून भारतीय सैन्याला गौरविले जाते. प्रत्येक भारतीयाने सर्जिकल स्ट्राइक विषयी गर्व व अभिमान बाळगून भारतीय सैन्याचा सन्मान वाढविला पाहिजे असे मत लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी व्यक्त केले.

तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने ‘सर्जिकल स्ट्राइक डे’ डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. सद्यस्थितीत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एन सी सी अधिकारी व राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेटस यांनी हा दिवस भारतीय सैन्याची गौरव गाथा म्हणून साजरा केला. यावेळी महाविद्यालयातील एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी उरी हल्ल्याच्या प्रतिकारा दाखल ोपाकिस्तान समर्थित आतंकवाद्यांच्या प्रशिक्षण तळाना उद्ध्वस्त करण्याची योजना, अंमलबजावणी व त्यानंतर संपूर्ण जगभरात उमटलेल्या प्रतिक्रिया यावर पी पी टी सादरीकरण केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धीमन यांच्या मार्गदर्शनाखाली लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी पुढाकार घेत सर्जिकल स्ट्राइक डे साजरा केला. यावेळी महाविद्यालयाच्या 45 कडेट्सने उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून भारतीय सैन्यात दाखल होऊन देशाची सेवा करण्याचे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी तापी परिसर मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी, आमदार, रावेर विधानसभा मतदारसंघ, उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष श्री दामोदर हरी पाटील, चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य प्रा पी एच राणे, श्री मिलिंदबापू वाघुळदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य डॉ उदय जगताप, उपप्राचार्य डॉ अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा दिलीप तायडे, सुभेदार मेजर कोमलसिंग तसेच प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मंदार बामनोदकर, अजय पाटील, मंगलसिंग पाटील, अक्षय मोरे, आकाश कोळी, ईश्वर चौधरी, अजय चौधरी, आशराज गाढे यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button