शहिद भगतसिंह स्मृती विशेषांक नव्या पिढीचा प्रेरणादायी –
खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन
खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या शुभहस्ते शहीद सन्मान स्मृती विशेषांकाचे प्रकाशन
चाळीसगावचे संपादक शिवश्री पंकज रणदिवे ,शिवव्याख्याते जयश्री रणदिवे यांचे केले अभिनंदन
चाळीसगाव नितीन माळे
येथील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते दांपत्य पंकज रणदिवे व जयश्री रणदिवे यांनी संपादित केलेले शहीद सन्मान स्मृती विशेषांकाचे प्रकाशन आज खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या विशेषांकास डॉ. बालाजी जाधव औरंगाबाद ,शिवश्री अनिल पाटील मालेगाव, शिवश्री भास्कर निर्मळ प्रदेशाध्यक्ष वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाने पंकज रणदिवे व जयश्री रणदिवे यांनी शहीद सन्मान स्मृतीविशेषांक प्रकाशित केला आहे. या विशेषांकाचे आज खासदार उन्मेश दादा पाटील यांचे संपर्क कार्यालय विमोचन करण्यात आले. या प्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी रणदिवे दांपत्याचे कौतुक करीत शहिद भगतसिंह यांचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढी समोर यावा यासाठी एक स्तुत्य प्रयत्न केला आहे याप्रसंगी नगरसेवक नितीन दादा पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा नगरसेवक आनंद खरात, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जैन,
किराणा व्यापारी असोसिएशन संचालक अजय वाणी,
डॉ. प्रवीण भोकरे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष पू. मा. अमृतकार,सुनील जमादार, मधुकर गोपाळ, कृषी अमृतकार, नंदु चव्हाण, अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.






