Amalner

अमळनेर : डांगर बू येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..

अमळनेर : डांगर बू येथे पिक नियोजनाची जलमिञांची गावसभा संपन्न..

अमळनेर तालुक्यातील डांगर बू येथे पिक नियोजनाची गावसभा घेण्यात आली. दि 8 रोजी संध्याकाळी डांगर बू येथे गावातील ग्रामस्थांच्या ऊपस्थित जलमित्र देविदास पाटील,ललित नेरकर,तूषार नेरकर,प्रविण पाटील,दूषंत पाटील यांच्या प्रयत्नातून गावसभा घेण्यात आली.
ह्या गावसभेला लोकांना बोलावण्यासाठी समृद्धगावयौद्ध्यांनी फोन आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून येण्याचे आव्हान केले, गावात दवंडी दिली. डांगर बू गावातील जलमिञ देविदास पाटील यांनी *वॉटर कप* स्पर्धे दरम्यान गावात कुठली जलसंधारणाची कामे झाली याची थोडक्यात माहिती दिली. नंतर पाटोदा आणि हिवरे बाजार ची फिल्म दाखवून जलव्यवस्थापनाची भूमिका स्पष्ट करून त्यावर चर्चा केली. त्यामध्ये आता आपण सुद्धा हिवरे बाजार प्रमाणे जलव्यवस्थापन करण्यासाठी माहिती संकलित करत आहोत. जेणेकरून आपल्याला जलव्यवस्थापन करता येईल. त्यानंतर PPT च्या माध्यमातून संकलित गावकऱ्यांसमोर मांडली. त्यावर चर्चा देखील झाली. त्यामध्ये यावर्षी आतापर्यंत गावामध्ये पडलेला पाऊस, विहिरींची पातळी, मागील रब्बी, बारमाही, द्वीहंगामी पिकांसाठी 54.36 कोटी लिटर चा उपसा झाला. आणि या वर्षी रब्बी, बारमाही, द्वीहंगामी पिकांसाठी 18.42 कोटी लिटर चा उपसा करण्याचे नियोजन आहे.

चर्चेला आलेले मुद्दे
1) ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे.
2) पाण्याचा काटेकोर वापर.
3) आपण या वर्षी पाणी कमी वापर करणार आहोत.
4) मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी उपसा कमी आहे.
5) जे शेतकरी पटपणी देतात त्या ऐवजी आपण ठिबक वापरावं.
6)पिक पद्धत योग्य आहे.

झालेले निर्णय
1) ठिबक खालील क्षेत्रात वाढ करणे.
2) जल व मृदा संधारणाचे कामे करून जास्ती जास्त पाणी साठा वाढवने
3)कमी पाण्या वरती येणारी हरभरा,दादर सारखी पिक घेणे
यानंतर गावचे ललित नेरकर यांनी गावकर्‍याचे आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button