पोलिस उपनिरीक्षक शंकर मुटेकर सुर्यदत्त कोरोना योद्धा २०२१ पुरस्काराने सन्मानित…
दत्ता पारेकर पुणे
पुणे : गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून संपूर्ण देशावर कोरोना महामारिचे सावट होते. देश अजुनही यातून बाहेर पडलेला नाही. याला अटकाव करण्यासाठी लाॅक डाउन करण्यात आला. या काळात खरी कसरत केली ती पोलीस प्रशासनाने. जनतेना घरात सुखरुप ठेऊन रस्त्यावर रात्रंदिवस खडा पहारा देत पोलीसाने पार पडलेले कर्तव्य पाहून सुर्यदत्त ग्रुप आँफ इन्स्टिट्युट पुणे यांच्या वतीने इंदापूर महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरिक्षक शंकर म. मुटेकर यांना सुर्यदत्त कोरोना योध्दा – २०२१पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना पो.उपनिरिक्षक मुटेकर म्हणाले की कोरोना या संसर्गजन्य आजाराचे लाँकडाउनच्या काळात पार पाडलेल्या कर्तव्याबद्दल मला देण्यात आला त्याबद्दल सर्वप्रथम मी संस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो.कोरोना या संसर्गजन्य आजाराची साथ अद्याप आटोक्यात आलेली नाही. यासाठी शासनाने दिलेल्या नियमाचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे. नियमित पणे मास्क , सँनेटायझर चा वापर करावा.लोकांच्या समुहात गेल्यावर सुरक्षित अंतर ठेवावे. कोरोना बाबत काही लक्षणे दिसत असल्यास तात्काळ जवळच्या दवाखाण्यात जावुन तपासणी करावी.माझे कुटुंब माझी जबाबदारी या प्रमाणे प्रत्येकाने स्व:ताची व कुटुंबाची काळजी घेऊन शासनस सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.






