गंजगाव जि.प.प्रा.शाळेत शिक्षक उपलब्ध करा
नांदेड प्रतिनिधी (वैभव घाटे)
बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाची अपुरी संख्या आसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे गंजगाव गाव हे तिन हाजार लोकवस्तीचे गाव आसुन येथिल जिल्हा परिषद डिजीटल शाळा व सुंदर इमारत आसुन पहीले ते सातवी पर्यत वर्ग आहेत येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यां पटसंख्या चांगल्या प्रकारे आसुन शिक्षक संख्या चार आहेत चार शिक्षका पैकी दोन शिक्षकाना तहसिल कार्यालया कडुन बि.एल.ओ चे काम देण्यात आले आहे बाकीचे दोन शिक्षक सातवी पर्यतचे वर्ग सांभाळत आहेत सदरील शाळा डिजीटल शाळा म्हणून घोषित केली आहे पण या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक नाहीत तर ही शाळा कुठल्या कामाची अशी नाराजी पालक व गावकर्यातुन होत आहे सदरील बाबीकडे गटशिक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष घालुन सदरील शाळेत शिक्षक संख्या उपलब्ध करावी अशी मागणी पालक वर्गतुन होत आहे .






