Nanded

बेटमोगरा येथे महाशिवरात्री निमित्त भव्य पालखी मिरवणूक संपन्न…

बेटमोगरा येथे महाशिवरात्री निमित्त भव्य पालखी मिरवणूक संपन्न…

बेटमोगरा येथील शिवलिंग बादशहा मठात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी…

नांदेड प्रतिनिधी :- वैभव घाटे

अखंड महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या बेटमोगरा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री.शिवलिंग बादशहा मठ संस्थानचे मठाधिश,श्री सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या अधिपत्याखाली महाशिवरात्री निमित्त दि.२१ फेब्रुवारी २०२० रोज शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता भव्य पालखी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोहळ्याची सुरुवात सामुहिक इष्टलिंग महापुजेनी करण्यात आली.ही पालखी मिरवणूक येथील शिवलिंग बादशहा मठातून निघून गावातील मुख्य मार्गासह टाकळी,चिटमोगरा येथे जाऊन परत गावातील अहिल्यादेवी होळकर नगर मधून पांदन रस्त्यामार्गे छत्रपती (मण्याड नदीकडून) बाजारपेठे मार्गे बसस्थानक परिसर मार्गे मुख्य रस्त्यांनी शिवलिंग बादशहा मठामध्ये विसर्जित करण्यात आली.

बेटमोगरा येथे महाशिवरात्री निमित्त भव्य पालखी मिरवणूक संपन्न...या पालखी मिरवणुकीत गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व माजी जि.प.सदस्य बळवंतराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय बालाजी पाटील,गावचे सरपंच सौ.पद्मजा खुशालराव पाटील, चिनू पाटील,लक्ष्मणराव बारहाळे,धनराज पाटील, भानुदास पा मोंडे,प्रकाश पाटील,भास्कर डोईबोळे, सुधाकर सूर्यवंशी,संतोष अमृतवाड,लक्ष्मण
पिटलेवाड,बाळासाहेब ढेकळे,संदीप साडपल्ले, आदीसह महिला,पुरुष व असंख्य जनसमुदाय या पालखी मिरवणुकीत सहभागी होता.
तसेच रात्री ८ वाजता सामुहिक इष्टलिंग महापुजा संपन्न झाली. व दि.२२ फुब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सामुहिक इष्टलिंग महापुजा व दुपारी १ वाजता बिल्वार्चन सोहळ्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी बहुसंख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button