Faijpur

प्रधानमंत्री आवास जोजनेची थकीत रक्कम त्वरीत मिळावी यासाठी-एकता फाऊंडेशनची मागणी

प्रधानमंत्री आवास जोजनेची थकीत रक्कम त्वरीत मिळावी यासाठी-एकता फाऊंडेशनची मागणी

प्रतिनिधी : सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : भारत सरकार गोर गरीब जनतेसाठी राबवीत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ही काही वर्षांपासून अत्यंत प्रभावीपणे राबवीत असल्यामुळे आतापर्यंत शेकडो बेघर गरीब कुटुंबांना त्याचा आधार मिळाला आहे.परंतु काही महिन्यांपूर्वी फैजपूर परिसरातील बर्याच गरीब कुटुंबांनी या योजनेतुन घरकुल साठी अर्ज केले असता त्यांचे ते मंजूर ही झाले.त्यानुसार त्यांना त्या योजनेचा पहिला टप्पा देखील मिळाला, परंतु त्यांचे घराचे बांधकाम सुरू असताना शासनाकडून अद्यापपावेतो मिळणारा दुसरा टप्पा अजुन मिळाला नाही.म्हणुन सदर लाभार्थींचे पुढील टप्प्याची रक्कम त्वरीत मिळावी व गोरं गरीब लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे अशी मागणी यावेळी फैजपूर प्रांताधिकारी,न.प.मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांचेकडे एकता फाऊंडेशन तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शेख ईरफान शेख इक्बाल यांच्यासह अजय मेढे,शेख नईम,शेख मुजाहिद,शेख मोहसिन ,भुषण सुधिर मेढे,शब्बीर शेख,शेख आसिफ,शेख मुदस्सर इ.एकता फाऊंडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button