पंढरपूर

रविवारी पंढरपुरात संविधान जागर निमित्त प्रबोधन*

*रविवारी पंढरपुरात संविधान जागर निमित्त प्रबोधन*

राहुल खरात

पंढरपुर- ; प्रतिनिधी / पाक्षिक धम्मप्रकाश व मित्र परिवार तर्फे रविवार दि.29.12.2019 रोजी सकाळी 10 ते सायं.6 या वेळेत प्राथमिक शिक्षक सभागृह,हॉटेल शामियाना जवळ, पंढरपुर येथे संविधान जागर कार्यक्रमा अंतर्गत विविध विषयावर समाज प्रबोधन करण्यासाठी अनेक वक्ते माहिती देणार आहेत. पहिले सत्रात थ्री वे मीडिया,मुंबई चे चन्द्रकांत सोनवणे- “पर्यायी प्रसार माध्यम आणि भारतीय लोकशाही”,डॉ.किसन इंगोले,मुंबई चे- “भारतातील सध्याची अर्थव्यवस्था” , मा. रंजन केदार ,मुंबई चे- “सहकारी पतसंस्था व समाज उन्नति” या विषयावर बोलणार असून त्या सत्राचे अध्यक्ष दैनिक पुढारी ,पंढरपुर चे जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे भुषविणार आहेत तर दूसरे सत्रात “भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यावर डॉ. टी.एस. मोरे,बार्शी चे आंबेडकरी विचारवंत,”सत्यसोधक विवाह चळवळीची गरज”-मा. रघुनाथ ढोक,प्रणेते,फुले शाहू आंबेडकर चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते,”वंचिताचे शिक्षण”-मा.रतन माळी, पुणे शिक्षण तंद्य, “भारतीय संविधान आणि नागरिकाचे हक्क व कर्तव्ये” -डॉ. दीपक गायकवाड़,मुंबई, जेष्ठ विचारवंत आणि अध्यक्ष म्हणून पी.आर.भोसले, आंबेडकरी विचारवंत भूषविणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन संपादक बा. ना.धाडोरे ,पाक्षिक धम्मप्रकाश केले असून मोलाचे मार्गदर्शन मा. सुरेश जगताप,मुंबई जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button