Yawatmal

गो तस्करीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका पुसद पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही

गो तस्करीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका पुसद पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही

गो तस्करीसाठी जाणाऱ्या साहा जनावरांची सुटका तर एका महिलेसह दोन आरोपी ताब्यात पुसद शहर पोलिसांची कार्यवाही

विशाल मासुरकर

– यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहर पोलीस स्टेशन च्या डीबी पथकाला दिनांक 27 रोजी रात्री एम एच 32 एजे 2101 या बोलेरो या वाहनातून गो तस्करीसाठी जनावरे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून डीबी पथकाचे दीपक ताठे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह सापळा रचून काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील येणाऱ्या वसंत उद्यान जवळ सदर बोलेरो वाहन ताब्यात घेऊन चौकशी केली.

गो तस्करीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका पुसद पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही

त्यामध्ये सहा जणांवरे कोंबून नेत असल्याचे निदर्शनास आले ही जनावरे कळंब येथून हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे गो तस्करीसाठी नेत असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले त्यावरून शहर पोलिसांनी गाडीसह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त करून सदर जनावराची सुटका करून यामध्ये एका महिलेसह दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले ही कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button