Pandharpur

महिला बचत गटाचे कर्ज सरसकट माफ करावे..दिलीप धोत्रे कुर्डुवाडी येथे मनसेचा भव्य मोर्चा

महिला बचत गटाचे कर्ज सरसकट माफ करावे..दिलीप धोत्रे
कुर्डुवाडी येथे मनसेचा भव्य मोर्चा

प्रतिनिधी रफीक आत्तार

कुर्डूवाडी शहरांमधील महिला बचत गटाचे सरसकट कर्ज माफ करावे आणि बचत गटाच्या महिलांकडून विमा करतो म्हणून घेतलेल्या पैशाची विमा पॉलिसी मिळावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या नेत्रत्वाखाली कुर्डुवाडी येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला,मागील सहा ते सात महिन्यांपासून धोरणामुळे सर्व ठिकाणचे व्यवसाय ठप्प झाले होते. यामुळे विविध बँकाआणि महिला बचत गटांचे कर्जाचे हप्ते थकीत झालेआहेत.मायक्रो फायनान्स चे कर्मचारी वसुलीसाठी तगादा लावत असून महिलांना दमबाजी केली जात आहे,महिलांच्या घरातील साहित्य कर्मचारी घेऊन जात आहेत हे सर्व बंद करून सरकारने कर्ज माफ करावे अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केली आहे.बचत गटाची रक्कम मिळताना विमा रक्कम म्हणून काही पैसे काढून घेतले जातात ,त्यामुळे या कोरोनाच्या वाईट परिस्थितीत तो विमा लागू करून महिलांचे कर्ज जमा करून त्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून देऊन ही महिला बचत गटाची चळवळ सुरू ठेवावी अशी मागणी मनसेने लावून धरली आहे.याबाबत मनसेचे दिलीप धोत्रे यांनी मागील चार महिन्यापासून अडचणीत आलेल्या या बचत गटाच्या महिलाना सवलत देण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे, त्यामुळे अनेक महिला बचत गटांच्या महिलानी आभार मानले आहेत.

राज ठाकरे यांच्या मनसेची ओळख सर्वाना जुनीच आहे. एखाद्या विषयावर जर मनसेने लक्ष घातले तर तो विषय निकालात काढण्यात या मनसेने आजवर काम केले आहे. त्यामुळे हा विषय दिलीप धोत्रे यांनी आता सम्पूर्ण राज्यातील महिलांना दिलासादायक असल्याने थेट हेबचत गट वसुली बाबतीत होणारा महिलांना जो त्रास आहे तो राज ठाकरे यांच्या पर्यंत पोहचविले आहे. यावेळी कुर्डुवाडी शहर अध्यक्ष सागर बंदपट्टे, आकाश लांडे, सुभाष खटके, सागर लोकरे, सागर घोडके, अमोल लांडे आणि असंख्य महिला उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button