कोरोना महामारीच्या काळात लिटिल एंजल फाउंडेशनचा ऑनलाईन उपक्रम
औरंगाबाद गणेश ठेंबरे
लिटिल एंजल फाउंडेशन, ऐरोली,नवी मुंबई ही संस्था गरीब,गरजू व तळागाळातील मुलांच्या शिक्षणासाठी गेली तीन वर्षे अहोरात्र कार्य करीत आहे. झोपडपट्टी मधे राहाणारी बांधकाम कामगारांची व इतर गरजू मुलांना मोफत शिक्षण देण्याबरोबरच मुलांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभावे यासाठी सुध्दा ही संस्था कार्यरत आहे. गरीब कुटुंबांमध्ये मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होत असल्याने पालकांना व मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहीत केले जात आहे. करोणा माहामारीच्या काळात गरजू मुलांना भौतिकशिक्षण जरी देता येत नसले तरी, लिटिल एंजल फाउंडेशनचा शिक्षक वर्ग ऑनलाईन उपक्रमा मार्फत या मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवत आहे. मागील दोन महिन्यांपासून या संस्थे मार्फत ८० ते ९० प्रशिक्षित व्हाॅलिटीयरच्या माध्यमातून तांत्रिक अडचणीवर मात करत जवळजवळ १५० विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देत आहे.
नवी मुंबईतील झोपडपट्टी विभागात शैक्षणिक उपक्रम राबविले जात असतांनाच या वर्षी ऑनलाईनच्या माध्यमातून ही संस्था ग्रामिण भागातही पोहचत आहे. प्रत्येक मुलांकडे वैयक्तिक पातळीवर लक्ष केंद्रित करून गुगल व झुम मिटिंगच्या माध्यमातून मुलांच्या शंकांचे निराकरण, प्रश्र्नाची उत्तरे ,व फेस टू फेस पांठाचे वाचान केले जात आहे.
ही संस्था शैक्षणिक उपक्रमा बरोबर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सुध्दा प्रयत्नशिल आहे.त्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा,टेबल पाठांतर,कवितांचे वाचन, इत्यादी उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्रातील अधिकाधिक गरीब व गरजू मुलांपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून मोफत शिक्षणाचा हा उपक्रम राबविण्याचा मानस या संस्थेच्या सभासदांनी व्यक्त केला आहे.






