जेसीआयमधून सर्वांगीण नेतृत्व तयार होते — जेसी तथा खासदार उन्मेश दादा पाटील
देशातील छत्तीसगड, ओरिसा, मध्यप्रदेश ,उत्तर प्रदेश यासह महाराष्ट्र राज्यातील एकशे चाळीस क्लब अध्यक्षांची कार्यशाळेला उपस्थिती
सहा, नऊ आणि तेरा झोन मधील अध्यक्षांची कार्यशाळेचे उदघाटन
मनोज भोसले
भुसावळ — एखाद्या सामाजिक कामासाठी अनेक संस्था संघटना काम करतात मात्र विविध विषयांसाठी काम करणारी जेसीआय मध्ये मला देखील काम करण्याची संधी मिळाली. २०११ मध्ये अध्यक्ष असतांना स्पिचक्राफ्ट कार्यशाळा आयोजित केली. त्यामुळे राज्य आणि राज्याबाहेर मोठा मित्र परिवार जोडता आला. जेसीआयच्या विविध उपक्रमातून अनेक पदाधिकारी घडले. जेसीआय ही सर्वांगीण नेतृत्व घडविणारी संस्था असल्याचे मत केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतीक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज येथे व्यक्त केले आहे.भुसावळ वरणगाव हायवे वरील तनरिका रिसॉर्ट येथे आयोजित महाराष्ट्रासह पाच राज्यातील अध्यक्षांच्या कार्यशाळेचे उदघाटन करतांना खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. व्यासपिठावर दीपा पटेल, डॉ।निलेश झंवर,अनुपम तिवारी, मनोज चांडक, निर्मल मुनोत, अजय शर्मा, वालुरी श्रीनिवासन, निलेश देशमुख आमदार संजय सावकारे यांच्या धर्मपत्नी सौ. सावकारे उपस्थित होत्या. यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी हिंदीतून संवाद साधला. ते पुढे म्हणाले की आजची कार्यशाळा येणारे वर्षभराचे नियोजन करण्यासाठी आहे. स्वतःला झोकून काम केले तर आपल्या कडे राज्य पदाधिकारी यांचे लक्ष वेधले जाणार आहे. मी देखील जेसीआय अध्यक्ष असतांना वर्षभर नवनवे उपक्रम राबविले होते त्यातून कमी वेळेत लाखो लोकांपर्यंत पोहचता आले.






