Jalgaon

?जळगांव Live.. कोरोना Update.. आज जिल्ह्यात 1100 पार..तर अमळनेर 166 कोरोना बाधित रुग्ण…!

?जळगांव Live.. कोरोना Update.. आज जिल्ह्यात 1100 पार..तर अमळनेर 166 कोरोना बाधित रुग्ण…!

जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरूच असून आज दिवसभरातील कोरोना रुग्णवाढ अकराशे पार गेलेली आहे. जिल्ह्यात दिवसभरात नवीन तब्बल 1183 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत.यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 81969 इतकी झाली. तर आज जिल्ह्यात तब्बल 13 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून तब्बल 995 रुग्ण कोरोनामुक्त झाले.आतापर्यंत एकूण 69976 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून एकूण 1539 बळी गेलेले आहेत तर 10454 रुग्ण उपचाराधीन आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे.अमळनेर तालुक्यात आज 1235 चाचण्या घेण्यात आल्या यात 166 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
आजच्या शहरात अँटीजन चाचण्या 450 त्यात 83 पॉझिटिव्ह ! ग्रामीण भागात 15 पॉझिटिव्ह आणि चार ते पाच दिवसांपूर्वी घेतलेल्या आर टी पी सी आर चाचण्याचे रिपोर्ट आज आले त्यात 68 पॉझिटिव्ह आहेत अशी एकूण संख्या 166 झाली आहे.?जळगांव Live.. कोरोना Update.. आज जिल्ह्यात 1100 पार..तर अमळनेर 166 कोरोना बाधित रुग्ण...!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button