Maharashtra

“धींग एक्स्प्रेस” हिमा दास एका आदिवासी कन्येचं यश….जातीयवादी मीडिया आणि मानसिकता..

“धींग एक्स्प्रेस” हिमा दास एका आदिवासी कन्येचं यश….जातीयवादी मीडिया आणि मानसिकता..

&Quot;धींग एक्स्प्रेस&Quot; हिमा दास एका आदिवासी कन्येचं यश....जातीयवादी मीडिया आणि मानसिकता..


संपादकीय प्रा.जयश्री दाभाडे साळुंके
(दर रविवारी विशेष विषयासह..वाचा)
 14 जुलै 2018 मध्ये  हिमा दास हिने 400 मीटर च्या रेसमध्ये जिवाच्या आकांताने धावत देशाला सुवर्णपदक मिळवून दिल होत. काय पळाली होती पोरगी… सुवर्णपदक घेऊनच थांबली. या सुवर्णपदकानंतर तरी देश कौतुक करेल.
परंतु शर्यत जिंकल्यानंतर तिला इंग्लिश बोलता आलं नाही. तिला ते येतच नव्हतं.इथल्या प्रसार  माध्यमांनी मग तिच्या सुवर्णपदकापेक्षा तिला इंग्लिश येत नाही,यावरच फोकस केला आणि  तीच ते सुवर्णयश झाकळून टाकलं होतं. ती ग्लॅमरस नाही याला इथल्या पांढरपेशी समाजाने देखील फोकस करत आपल्या जातीयवादी,कोत्या, नीच आणि हलकट मानसिकतेच जाहीर प्रदर्शन केलं होतं.
खरतर हिमा तेंव्हा रेसमध्ये इंग्रजी बोलण्यासाठी धावलीच नव्हती.ती देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी धावली होती.आपल्या स्पाईक्स वर सराव करून.
कोणाचीही मदत न घेता पावडर टिकली न करता देशासाठी धावली होती.
या सगळ्या गोष्टींच मूळ तिच्या अतिमागास आदिवासी असण्यात होत.एक आदिवासी  वर्गातील पोरगी फाटक्या स्पाईक्स वर जीव तोडून सराव करते काय…आणि प्रत्यक्ष रेसमध्ये सुवर्णपदक जिंकून देते काय…हे सगळंच अनाकलनीय ,अनपेक्षित होत इथल्या त्या जातीयवादी  समाजाला धक्का देणार होतं … ज्यांची मीडियामध्ये आणि इतर सर्व क्षेत्रात मक्तेदारी होती. हिमा च्या ऐवजी इतरव कोणी  असती तर बहुतेक विचार झाला असता त्या नावाचा…पण एकतर ती आदिवासी त्यात ती स्त्री  असणं देखील एक अडचणीच आहे.
जुलै 2019 मध्ये  हिमाने मागच्या 15 दिवसात 5 सुवर्णपदकाची कमाई केली आहे.तरी तिला ग्लॅमर किंवा कौतुकाची थाप मिळणं शक्य नाही.कारण इथं कौतुक फक्त जात बघून होत..! आणि कोणाचं कौतुक करायचं आणि कोणाला अनुल्लेखाने मारायचं हे इथला मीडिया ठरवतो. त्याला या उच्चवर्णीय लोकांच्या दावणीला बांधला गेलेला बहुजन अन हरिजन समाज देखील खतपाणी घालतच असतो..!
       ती देशासाठी खेळली अन जिंकली…. देशाला गौरव व पाच पदके  मिळवून दिली….एवढ्या वरच थांबली नाही तर आसाम राज्यांतील पूरग्रस्तांसाठी पगारीचा अर्धा हिस्सा आर्थिक सहाय्य करतं मानवावादी माणुसकी जागवली….
      तरीही काही  जातीयवादी लोक व बिकाऊ  मीडिया जातं बघून भेदाभेद करण्याची चमचेगिरी करतात…   

&Quot;धींग एक्स्प्रेस&Quot; हिमा दास एका आदिवासी कन्येचं यश....जातीयवादी मीडिया आणि मानसिकता..

                

कोचने कर्ज घेऊन धावण्यासाठी पाठवलं होतं, आता 15 दिवसांत 5गोल्ड मेडल जिंकलेत तीने.
धींग एक्सप्रेस’ नावाने ओळखली जात असलेली हिमा सध्या सर्वत्र नाही तरी बऱ्यापैकी कौतुकाचा विषय आहे खेळातील चमकदार कामगिरी बरोबरच, तीने पुराच्या संकटात असलेल्या आपल्या आसाम राज्यातील पुरग्रस्तांसाठी स्वतःचा अर्धा पगार म्हणुन दिला. तिच्या या कृतीने सर्वांची मने जिंकली.
 वाचा हिमाच्या आयुष्याबद्दल……
हिमाचा  एकत्र परिवार आहे ज्यात १७ सदस्य आहेत. त्यांचा परिवार ६० बीघा जमिनीवर शेती करतो, वर्षभर पिके घेतो आणि तळ्यात मासे पाळतात.
करियरची सुरुवात कशी झाली?     
                   
प्रत्येक खेळाडू ची सुरूवात जशी होते, हिमाची देखील जवळपास तशीच झाली. हिमातील धावण्याच्या कौशल्याला सर्वात अगोदर २०१४ साली एका आंतरशालेय स्पर्धेत नवोदय विद्यालयाचे ट्रेनर शम्स-उल-हक यांनी ओळखले. यानंतर शम्स यांनी प्रशिक्षक गौरीशंकर राॅय यांच्याशी हिमाची भेट करुन दिली. याच गौरीशंकर राॅय यांनी पुढे क्रिडा आणि युवक कल्याण निदेशालयाचे प्रशिक्षक निपोण दास आणि नबोजित कौर यांच्याशी तिची भेट घालुन दिली. या दोन्ही प्रशिक्षकांना हिमावर इतका प्रचंड आत्मविश्वास होता की, त्यांनी तिला २०१७ सालातील नैरोबीत झालेल्या युथ वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी अक्षरशः कर्ज काढले..
हिमाची कामगिरी घरच्यांना समजलीच नाही
हिमाने टेम्पेरेतील विजयानंतर तिच्या घरच्यांना फोन केला. त्यांना अजुन जाणीवच नव्हती की त्यांच्या मुलीने काय करुन दाखवलंय.   सकाळी त्यांना कळलं की त्यांच्या मुलीने इतिहास रचला आहे.सलाम आहे हिमा तुझ्या जिद्दीला आणि देशप्रेमाला….आदीवासी आहेस म्हणून घाबरू नकोस इथे आपल्याला स्वतःला खूप सिद्ध करावं लागतं त्याशिवाय आपल्या कार्याला किंमत नाही ग…कारण आपण उच्च जातीत जन्माला आलो नाहीत आपल्या कडे पैसा नाही…आपल्या कडे ग्लॅमर नाही तरीही आपण आपणच आहोत …करू दे दुर्लक्ष…करू दे भेदभाव पण आपण थांबणार नाही… तुझी यशाची घौडदौड सुरू ठेव…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button