?️ Big Breaking अमळनेरची कोरोना रुग्ण संख्या ट्वेन्टी- 20 ..
अमळनेर येथे कोरोनाची रुग्ण संख्या वाढतच असून आज रोजी अमळनेर तालुक्यात आतापर्यंत एकूण 20 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत व 6 रुग्ण मयत झालेले आहेत .आत्ताच आलेल्या जळगाव जिल्ह्यातील यादीमध्ये अमळनेरचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.अमळनेर येथील रुग्ण महिला असून अमलेश्वर नगर येथील रहिवासी आहे.ही महिला कोरोना बाधित रुग्णाची नातेवाईक आहे.आज तीन रुग्ण पुन्हा जळगांव येथे पाठविण्यात आले आहेत.
जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी एकूण 47 व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. त्यापैकी 43 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 4 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
या चार व्यक्तीमध्ये अमळनेर येथील एक, जोशीपेठ, जळगाव येथील एक तर पाचोरा येथील दोन व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 41 इतकी झाली आहे. त्यापैकी बारा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.






