Amalner

आर के नगर परिसरातील ओपन प्लेसमध्ये साचले पाणी.. माजी आ. साहेबराव पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली पाहणी… कायमस्वरूपी उपाययोजना करावी म्हणून नागरिकांनी केली मागणी….

आर के नगर परिसरातील ओपन प्लेसमध्ये साचले पाणी.. माजी आ. साहेबराव पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली पाहणी… कायमस्वरूपी उपाययोजना करावी म्हणून नागरिकांनी केली मागणी….

रजनीकांत पाटील

अमळनेर:- येथील धुळे रोड आर के नगर परिसरात नैसर्गिक उताराच्या दिशेने नाले नसल्याने शेतातून वाहून येणाऱ्या पावसाच्या पाण्याने घरांचे होणारे नुकसान आणि नागरी आरोग्याचा प्रश्न यामुळे परिसरातील नागरिकांचे वर्षानुवर्षे हाल होत आहे. सदर परिसरात कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी स्थानिक रहिवाश्यांनी नगरपरिषदेचे पालक नेतृत्व मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल यांच्या पाहणीभेटी दरम्यान केली आहे.प्रांताधिकारी, तहसिलदार,मुख्याधिकारी यांनीही भेट देऊन पाहणी केली.

धुळे रोड परिसरातील आर के नगर,सर्वज्ञ नगर,भगतसिंग चौक,पहाडे रेसिडेन्सी, विनोद सोसायटी, नागाई नगर,भारत गॅस एजन्सी,रवी नगर,परिसरातील भागात मंगरूळ शेती शिवरातून पावसाचे पाण्याचे लोंढे वाहत येतात.त्यामुळे परिसरातील नागरिकांचे,लहान मुलं,स्त्री पुरुष वृद्धांचे घराबाहेर पडणेही मुश्कील होते.पाण्याचे ओढे कॉलनीतील रस्त्यावरून वाहतात.तर अनेक ओपन प्लेसच्या भागात गुडघ्यावर पाणी साचलेले असते त्यामुळे डास आणि रोगराई चा प्रश्न निर्माण होऊन नागरी आरोग्याच्या गंभीर समस्या उभ्या राहतात याबाबतच्या सततच्या तक्रारी लक्षात घेऊन नगरपालिकेचे सत्ताधारी गटाचे पालक नेतृत्व मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी न पा चे अधिकारी पदाधिकारी यांच्यासोबत परिसरात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांचेसह मा.नगरसेवक महेश देशमुख, ऍड किशोर बागुल, विजय पाटील,राजेंद्र पाटिल, भूषण भदाणे व स्थानिक रहिवश्यांनी आर के नगर च्या दक्षिणबाजूने पश्चिम-पूर्व दिशेने कायमस्वरूपी नाल्याचे काम करण्यात यावे.शेतातील वाहून येणारे व परिसरातील पाणी सदर नाल्याद्वारे पिंपळे नाल्यात सोडण्यात यावे अशी मागणी केली.तर कॉलनी परिसरातील रस्ते,गटारी व ओपन प्लेस चाही विकास व्हावा अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांकडे केली आहे.

याप्रसंगी संभाव्य उपाय योजनांबाबत जाणून घेत स्थानिकांशी चर्चा करून तातडीच्या उपाय योजनाबाबत संबंधित्तांना कळवत मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल यांनी नागरिकांना लवकरच योग्य त्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत आश्वासित केले.यावेळी नगरसेवक मनोज पाटिल,राजेश पाटिल, निलेश साळुंखे, न प बांधकाम विभागाचे संजय पाटील आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापूर्वी हि आर के नगर परिसरातील नागरिकांनी रणजित शिंदे ,राजेंद्र पाटील यांचे सह मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल यांची जुलै महिनाअखेर राजभवन येथे भेट घेऊन नाला,गटार,रस्ते स्थानिक समस्याबाबत सविस्तर माहिती दिली होती. नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता पाटिल व मुख्याधिकारी यांना
निवेदनहि दिले होते.आज मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल यांनी प्रत्यक्ष भेट देऊन धुळे रोड आर के नगर,सर्वज्ञ नगर,भगतसिंग चौक , आर के नगर ओपन प्लेस ,पहाडे रेसिडेन्सी या वर्षानुवर्षे समस्या ग्रस्त परिसराची पाहणी केल्याने व समस्या जाणून घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्याही परिसराला भेटी…
सायंकाळी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल यांनी पुन्हा प्रांताधिकारी सिमा अहिरे,तहसीलदार मिलिंद वाघ,न पा मुख्याधिकारी विद्या गायकवाड, न पा चे अधिकारी संजय चौधरी यांचेसह या परिसरात भेट देऊन उपाययोजना करण्याबाबत पाहणी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button