प्र.डांगरी गावाच्या सुरक्षेसाठी तरुण झाले खंबीर ग्रामसुरक्षा दलाची स्थापना
रजनीकांत पाटील
अमळनेर :- जगभरात कोरोना सारख्या आजराने थैमान घातले असता कोरोनाचा प्रदूर्भाव हा आपल्या गावाजवळील काही अंतरावर येऊन ठेपला असता अमळनेर तालुक्यातील डांगरी येथिल काही तरुणांनी गावाच्या सुरक्षेसाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली असून गावातील तरुण गावाच्या रक्षणासाठी सज्ज झाले आहेत.
जगभरातील कोरोना व्हायरस विषाणु ने अमळनेर तालुक्यात देखील डोके वर करत पाय पासरविण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक गावात सुरक्षिततेचे उपाय अवलंबण्यात येत आहे. प्र.डांगरी गावात ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. बाहेरील येणाऱ्या व्यक्तीस गावात प्रवेश बंद केला आहे. तरी गावात येणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. सुरक्षा ग्रामदलातील तरुण हे गावासाठी तीन तीन तास करून सुरक्षा देणार टप्प्याटप्प्याने पहारा देत कडक बंदोबस्त ठेवणार आहेत.गावात बाहेरील येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीस गावात प्रवेश संपुर्ण बंद केला आहे. तसेच या तरुणांना सरपंच अनिल शिसोदे, ग्रामपंचायत सदस्य व पोलिस पाटील पंजाबराव वाडीले यांचे सहकार्य लाभत आहे.






