Maharashtra

मुख्याधिकारी यांनी मानले फैजपुर करांचे आभार यापुढेही प्रशासनाला सहकार्य करा मुख्याधिकारी किशोर चव्हाण

मुख्याधिकारी यांनी मानले फैजपुर करांचे आभार यापुढेही प्रशासनाला सहकार्य करा मुख्याधिकारी किशोर चव्हाण

प्रतिनिधी सलीम पिंजारी

लॉकडाऊनचा कालावधी आता 17 मे पर्यत वाढवला आहे.शासनाच्या निर्देशानुसार आपला जळगांव जिल्हा हा रेड झोन मध्ये आहे.शासनामार्फत आलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार आता आपल्या फैजपुर शहरातील परिस्थिती कशी असेल याबाबत नगरपरिषदे मार्फत पुढील सुचना देण्यात येत आहे.
1. लॉकडाऊन चा कालावधी 17 मे 2020 पर्यत सुरु राहील.
2. फैजपुर शहरातील सर्व जीवनावश्यक वस्तु दुकाने,जसे कि किराणा,औषध दुकाने,दुध डेअरी वगैरे पुर्वी प्रमाणे सुरु राहतील.
3. शहरातील सर्व सलून,केश कर्तनालये पुर्णपणे बंद राहतील.
4. फक्त परवानगी दिलेल्या कारणासाठीच,चार चाकी मध्ये वाहन चालकासह एकुण तीन व्यक्ती व दुचाकीवरुन फक्त एक
व्यक्ती यांनाच परवानगी असेल.
5. सर्व मार्केंट आणि व्यापारी भागातील जीवनावश्यक वस्तु सोडुन इतर सर्व दुकाने पुर्णपणे बंद राहतील.
6.व्यापारी भाग व मार्केट परिसर सोडून ज्या रहिवासी भागात जीवनावश्यक वस्तु वगळता इतर बाबींचे सिंगल म्हणजे एकच दुकान असेल अश्या कोणत्याही दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी हे स्थानिक प्रशासन निश्चित करेल त्यानुसार दिली जाईल.तथापि अशी परवानगी दिल्यानंतर Social Distancing व मास्क वापरणे अनिवार्य असेल.
7. सार्वजनिक ठिकाणी जसे की रस्ते,बाजार शासकीय कार्यालये, येथे Social Distancing व मास्क वापरणे अनिवार्य
असेल.
8. एका ठिकाणी पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास बंदी असेल
9. रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास प्रति व्यक्ती 500 रु इतका दंड आकारण्यात येईल.
10. सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणे,गुटखा, पान व इतर तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करण्यास बंदी आहे
11..60 वर्षावरील व्यक्ती, 10 वर्षाखालील बालके , गरोदर स्त्रिया व दुर्धर आजार असलेल्या व्यक्ती यांनी वैद्यकीय कारण
वगळता इतर कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडण्यास बंदी आहे.
12. सायंकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधी मध्ये अत्यावश्यक कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडण्यास बंदी आहे.
13.शहरात नव्याने दाखल झालेले स्थलांतरीत कामगार,विद्यार्थी व इतर व्यक्ती यांनी ग्रामीण रुग्णालय न्हावी येथे वैद्यकीय तपासणी करुन करुन घ्यावी.
14.अंत्यविधीप्रसंगी सदर ठिकाणी 20 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नसेल.तथापि सदर ठिकाणी सर्व उपस्थितांनी *Social Distancing 15.चे पालन करणे,मास्क चा वापर करणे आवश्यक आहे.*
तसेच नागरिकांनी *Google Play Store* वरुन *आरोग्य सेतु* app डाऊनलोड करुन घ्यावा.ज्याचा उपयोग कोरोना संबंधीत महत्वाची प्रतिबंधात्मक व संरक्षणात्मक माहिती नागरिकांना मिळू शकेल.
*हे कोरोनाचे संकट अजुनही टळलेले नाही.आपल्या शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठीच शासनाकड्न आलेल्या आदेशानुसारच या सुचना दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी कृपया शासनाकडुन आलेल्या सुचनांवरच विश्वास ठेवावा व त्याची अंमलबजावणी करावी*
आपण यापुर्वी जसे सहकार्य केले तसेच सहकार्य येणा-या काळात स्थानिक प्रशासनास कराल याची आम्हाला खात्री आहे आणि तुमच्या सहकार्यानेच आपण फैजपुर शहराला कोरोनामुक्त राखण्यास यशस्वी ठरु असा विश्वास
व्यक्त केला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button