Amalner

जलसंधारण मंत्र्यांना मतदारसंघातील बंधाऱ्याच्या कामांना मान्यता व दुरुस्तीसाठी निधी देण्याची आमदार अनिल पाटील यांनी केली मागणी.

जलसंधारण मंत्र्यांना मतदारसंघातील बंधाऱ्याच्या कामांना मान्यता व दुरुस्तीसाठी निधी देण्याची आमदार अनिल पाटील यांनी केली मागणी.

रजनीकांत पाटील अमळनेर

अमळनेर : अमळनेर मतदारसंघातील बंधाऱ्याच्या कामांना मान्यता देण्याची मागणी आमदार अनिल पाटील यांनी मुंबई येथे जाऊन मृदू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे भेट घेऊन केली आहे, सोबत नवनियुक्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मा.नंदकुमार जैन उपस्थित होते.
यावेळी मतदारसंघातील नदी व छोट्या नद्यांवरील नदीवरील गेट बंधाऱ्यांना जलसंधारण महामंडळमार्फत मान्यता व दुरुस्तीसाठी निधी द्यावी अशी मागणी केली. त्यात कुर्हे बु, कुर्हे खु, रामेश्वर पारोळा तालुक्यातील शेळावे बु, शेळावे खु, महाळपुर 1 महाळपुर 2, पुनगाव 1, पुनगाव 2, कोळपिंप्री, बहादरपूर 1, बहादरपूर 2, धाबे, दगडी सबगव्हाण, इंधवे 1, इंधवे 2, आंबापिंप्री 1, आंबपिंप्री 2, आंबपिंप्री 3, आंबापिंप्री 4, आंबापिंप्री 5 तसेच या कामांना मान्यता.
तर अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीवर असलेल्या ब्राम्हणे तर शिंदखेडा तालुक्यातील बेटावद दरम्यान असलेला बंधारा दुरुस्ती व शहापूर येथे नवीन गेटेड बंधारा कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा यासाठी पत्र दिले आहे याबाबत मंत्री महोदय यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button