Amalner

१९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सैनिक स्व.सुपडू महिपत दोरकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा

१९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सैनिक स्व.सुपडू महिपत दोरकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा …….

१९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सैनिक स्व.सुपडू महिपत दोरकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा

अमळनेर येथिल १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सैनिक स्व.सुपडू महिपत दोरकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा जोशींपुरा येथे मा.आ.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.अध्यक्षस्थानी अ. भा. वासुदेव जोशी गोंधळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश श्रीखंडे होते तर स्मारक उभारणारे नगराध्यक्षा सौ.पुष्पलता ताई पाटील मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
                    “स्वराज्य ज्यांनी मिळविले त्यांना आज स्वातंत्र्य उपभोगणारे विसरले आहेत,”अशी खंत व्यक्त करून  मा.आ.गुलाबराव पाटिल यांनी अमळनेरच्या स्वातंत्र आंदोलनाच्या इतिहासास उजाळा दिला. याप्रसंगी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी संत, समाजपुरुष, स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रेरणादायी स्मृती जपण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने स्मारक उभारले असल्याचे सांगितले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश श्रीखंडे यांनी, “जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहासात घडवू शकत नाही म्हणून  चालता बोलता इतिहास सांगणारे स्मारक जपले पाहिजे असे आवाहन करीत अमळनेर नगरपरिषद, नगराध्यक्षा यांचे आभार मानले.अहिराणी साहित्यिक  कवी कृष्णाजी पाटील यांनी अहिराणीतून अमळनेरचा स्वातंत्र्य इतिहास सांगितला. प्रा.अशोक पवार, बन्सीलाल भागवत यांनी स्वातंत्र्य सैनिक सुपडू दोरकर यांचे योगदानाबद्दल माहिती देतांना,१९४२ च्या स्वातंत्र्य आंदोलनात स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजींच्या प्रेरणेने सुपडू दोरकर इंग्रजांच्या विरोधात लढले.धुळे येथिल जेलमध्ये त्यांना डांबण्यात आले तर नंतर येरवडा,पुणेच्या जेलमध्ये बंदिस्त करण्यात आले होते.येरवडा कारागृहात  सुपडू दोरकर यांनी २०० कैद्यांसह केलेल्या श्रमदानातून जलकुंभ बांधल्याची नोंद आजही असल्याचे सांगितले. प्रास्ताविक,सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले.सदर स्मारकाची कल्पना मांडणारे वासुदेव गोंधळी जोशी समाजाचे अध्यक्ष विलास दोरकर,उपाध्यक्ष नारायण शिंदे, महेश जोशी,प्रभाकर दोरकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
     ●शैक्षणिक साहित्याचे वाटप●
          स्मारकाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांच्या माध्यमातून स्व.शिक्षक वामनराव देवकर व स्व.शिक्षिका सौ.कुमुदिनी देवकर यांच्या स्मरणार्थ समाजातील गुणी, होतकरू,हुशार,गरजू विद्यार्थ्यांना स्कुलबॅग, पॅड, कंपास, रजिस्टर बुक, वॉटर बॅग आदि भरगच्च शैक्षणिक साहित्य मा.आ.गुलाबराव पाटिल, नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील, मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, रमेशदादा श्रीखंडे, प्रा.अशोक पवार आदींच्या हस्ते वाटप करण्याचा सामाजिक सेवाभावी उपक्रम यावेळी राबविण्यात आला.
          कार्यक्रमास धुळे येथिल सामाजिक कार्यकर्ते सुरेश चौधरी, नगरसेवक मनोज पाटील,अड.यज्ञेश्वर पाटील, विक्रांत पाटील, राष्ट्रपती पदक विजेते सतिश देवकर,अशोक दोरकर, आधार साळुंखे, मा.सैनिक झुंबरलाल पाटील ,नंदुरबार येथिल पत्रकार भूषण दोरकर,धुळे येथिल पत्रकार संतोष देवकर, श्रीमती कमलबाई देवकर, आदिंसह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज मंडळ अध्यक्ष विलास दोरकर, उपाध्यक्ष नारायण शिंदे, नामदेव दोरकर,गणेश जोशी, गोरख दोरकर,लक्ष्मण दोरकर,सुरेश शिंदे,बन्सीलाल गंगावणे,रविंद्र शिंदे,कपिल दोरकर,प्रशांत शिंदे आदिंनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास परिसरातील स्थानिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button