कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा आदिवासी महिलांना मदतीचा हात…
अमळनेर : प्रतिनिधी निराधार वृद्ध महिलांना संजय गांधी , श्रावण बाळ व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी होणारा शारीरिक , मानसिक व आर्थिक त्रास वाचवून मदत केंद्र सुरू करून स्वखर्चाने एक व्यक्ती नेमून आदिवासी महिलांना लाभ मिळवून दिला आहे.
निराधार महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक वेळा हेलपाट्या माराव्या लागतात तसेच अज्ञानी असल्यामुळे व कर्मचाऱ्यांच्या उडवाउडवीची उत्तरांमुळे वृद्ध महिलांना पुन्हा पुन्हा येण्याचा शारीरिकव मानसिक त्रास होतो आणि दलालनमुळे आर्थिक झळ पोहचते म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी राजभवन येथे मदत केंद्र सुरू करून शंकर खैरनार या व्यक्तीची स्वतः पगार देऊन नियुक्ती केल्याने अनेक महिलांना एकाच ठिकाणी कागदपत्रे व माहिती दिल्याने त्यांचा त्रास वाचून त्यांना लाभ मिळाले आहेत नुकतेच 13 आदिवासी महिलांना लाभ देण्यात आला व प्रकरण मंजूर झाल्याचे पत्र देण्यात आले यावेळी कामगार नेते रामभाऊ संदनशिव , देखरेख संघाचे चेअरमन विक्रांत पाटील , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे , फयाजखान पठाण , रवींद्र पाटील हजर होते.






