Election Live: लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आभार..अमळनेर 18 व्या फेरी अखेर चित्र….
मुंबई विधानसभा निवडणूकीचे चित्र 16 व्या फेरी अखेर स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीला पाठिंबा मिळाल्याचे प्राथमिक चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे बारामतीत राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रतिस्पर्धी माविआ चे यूगेंद्र पवार यांना मागे टाकत अजित पवार विजयाच्या दिशेने आगेकूच करत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले आहेत. तसेच लाडक्या भावांचे ही आभार मानले आहेत. मुख्यमंत्री पदासाठी एकत्र बसून निर्णय घेतला जाईल. ज्यांच्या अधिक जागा त्यांचा मुख्यमंत्री असे ठरलेले नाही.
15- अमळनेर विधानसभा मतदार संघ
फेरी-18
1) डॉ.अनिल शिंदे (मविआ) –
2) अनिल भाईदास पाटील (महायुती) 82836
3) शिरीष चौधरी (अपक्ष) – 59654
*अनिल पाटील 22582 मतांनी आघाडीवर*






