अमळनेरातील युवा मेकॅनिकल इंजिनिअरची कमाल बनवले स्पर्श विरहित सॅनिटायझर मशीन
रजनीकांत पाटील
अमळनेर :- कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले असताना नवनविन कल्पनांचा शोध लावून त्यापासून बचावाचा प्रयत्न केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ आत्मनिर्भर बना’ या आवाहनाला प्रतिसाद देत अमळनेरातील युवा मेकॅनिकल इंजिनिअर धीरज चव्हाण आणि गौरव पाटील या दोघं मित्रांनी मिळून माजी मुख्याध्यापक मनोहर पाटील सर व डी ए सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्शविरहित सॅनिटायझर वापर स्टँड तयार केले आहे. मजबूत आणि दणकट बनावटीच्या स्टँडची हाताळणी करतांना मा. तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांनी ‘देऊया खान्देशी दणका, करूया कोरोनाचा भनका’ असे गौरवोद्गार काढून उपकरणाविषयी आनंद व्यक्त केला. तसेच या दोघा तरुणांचे कौतुकही केले. आणि सदरचे उपकरण हे आबाल वृद्धांपासून सर्वांनाच विविध आजारांनवर मात करण्यासाठी फारच उपयोगी होईल आणि आपले आणि सामाजिक आरोग्य चांगले सशक्त ठेवता येईल, असेही मत व्यक्त केले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी भरत वारे, लिपिक सोनवणे, पोलिस पाटील संघटनेचे प्रवीण गोसावी, सेवक शिवाजी कोळी, आणि उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे सर यांच्यासह धिरज चव्हाण व गौरव पाटील उपस्थित होते. सदर उपकरण आपण आपल्या कार्यालयात, घरात दरवाज्याजवळ, सार्वजनिक ठिकाणी ठेवून स्वतःचा तसेच इतरांच्या ही बचावासाठी मदत करू शकतात. उपकरणाच्या अधिक माहिती साठी 9284828126 , 9206002727 वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






