ऑलिम्पिक मध्ये सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी औरंगाबाद मध्ये सायकल रॅलीचे आयोजन
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : टोकियो ऑलिम्पिक मध्ये सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चिअरअप इंडीया या मोहिमेंतर्गत आज सकाळी औरंगाबाद इथल्या मोंढा नाका हून सायकल रॅली काढण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं औरंगाबाद विभागीय कार्यालय आणि औरंगाबाद इथल्या सायकलीस्ट संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅलीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. शहरातल्या विविध भागात सुमारे २० किमी या रॅलीनं मार्गक्रमण करण्यात आले आहे.






